शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
2
भीषण! बुलढाण्यात खासगी बस उभ्या ट्रकला धडकली; अपघातात ३८ जखमी, तिघांची प्रकृती गंभीर
3
वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही
4
पतीच्या मृत्यूचा धक्का झाला नाही सहन, शोकाकुल पत्नीनंही संपवलं जीवन, एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
5
ज्ञानेश्वरांनी भिंत कशी चालवली? दिग्पाल लांजेकरांचं मनं जिंकणारं उत्तर, म्हणाले- "प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधायला..."
6
तुमचेही पैसे ब्लूस्मार्ट वॉलेटमध्ये अडकलेत? रिफंडसाठी स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस फॉलो करा
7
लेख: श्रीमंत जिल्ह्यांना खुराक आणि गरीब जिल्हे मात्र उपाशीच?
8
"आगीच्या लोळासमोर पडलो अन् बिग बींनी...", अशोक समर्थ यांनी सांगितला अनुभव
9
"मी अमितचा हात धरला, बॉयफ्रेंडने गळा दाबला..."; नवऱ्याचा काटा काढणाऱ्या बायकोची कबुली
10
Beed Crime: डीजेच्या आवाजाची तक्रार केली, बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून बेदम मारहाण
11
५००० वर्षांपूर्वीचे 'हे' शहर आजही अर्थव्यवस्थेला लावतंय हातभार! आश्चर्यचकीत करणारी पर्यटनस्थळे
12
मोठी कारवाई! बीड सायबर ठाण्यातील वादग्रस्त PSI रणजीत कासले पोलिस खात्यातून डिसमिस
13
Usha Thakur : "पैसे, दारुच्या बदल्यात मतदान करणारे पुढच्या जन्मात उंट, मेंढ्या, कुत्रे, मांजर बनतील; जे लोकशाही...
14
बाळासाहेबांची सगळी स्वप्ने पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली; नीलम गोऱ्हे यांची सावध प्रतिक्रिया
15
चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम
16
IPL 2025: आईसारखी माया..!! गालावर हात फिरवून नीता अंबानींनी काढली इशान किशनची समजूत
17
मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्याला दाखवले चक्क कोंबड्यांचे फोटो; सोलापूर दौऱ्यावेळी गोंधळ
18
सिद्धार्थ जाधव माझा मुलगाच! महेश मांजरेकर म्हणाले- "मी त्याच्यासाठी काहीच केलं नाही, पण त्याने..."
19
'दामिनी' मालिकेतील अभिनेत्री आठवतेय का? म्हणते - "दामिनीचा प्रभाव आजही तसाच आहे..."
20
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

घनसावंगीतून सलग ५ विजय; गतवेळी मतविभाजनाने तारले, यावेळी राजेश टोपेंना जड जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 20:07 IST

पाचवेळा आमदार तरी मतदार संघाच्या विकासाचे काय? जिल्ह्यात पक्ष देखील मजबूत झाला नाही

जालना : आजवरच्या निवडणुकांचा निकाल पाहता एखादा अपवाद पाहता मतविभाजनामुळे आ. राजेश टोपे यांना विजयाचा गुलाला उधळता आला आहे. परंतु यंदाची निवडणूक टोपे आणि समर्थकांना वाटते तितकी सोपी नाही. टोपेंविरोधात महायुतीकडून तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न आहे. विशेषत: यंदाच्या निवडणुकीत टोपे यांना सामाजिक नाराजीचा मोठा फटका बसू शकतो, असे जाणकरांना वाटते.

१९९९ ते २०१९ या कालावधीत घनसावंगी (पूर्वीचा अंबड) मतदार संघातील मतदारांनी सलग पाच वेळा आमदार काम करण्याची संधी राजेश टोपे यांना दिली आहे. घनसावंगीचे आमदार आणि राज्य मंत्रीमंडळात मंत्री म्हणूनही टोपे यांना काम करण्याची संधी मिळाली आहे. २५ वर्षे प्रमुख पदावर असतानाही मतदार संघातील रस्ते, पाणी आणि विजेचा प्रश्न पूर्णपणे सोडविण्यात आ. टोपे यांना अपयशच आल्याचा आरोप महायुतीकडून केला जात आहे. विशेषत: मराठा आणि ओबीसी आंदोलनातील आ. टोपे यांच्या भूमिकेवर टीका झाली. त्यामुळे दोन्ही समाजातील नाराजीचा सामना यंदा टोपे यांना निवडणुकीत करावा लागणार आहे.

राष्ट्रवादी जिल्ह्यात मजबूत का झाली नाहीराष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, अजित पवार यांनी वेळोवेळी आ. राजेश टोपे यांना पक्ष-संघटन वाढविण्यासाठी बळ दिले. महिला संघटन वाढावे, यासाठी सुप्रिया सुळेही नेहमीच जालन्याच्या दौऱ्यावर असायच्या. परंतु, घनसावंगी, अंबड वगळता इतर तालुक्यात राष्ट्रवादी वाढलीच नाही, अशी टिका पक्षातीलच नेते खासगीत करतात. विशेष म्हणजे पक्षाचे प्रमुखपद आपल्या जवळच्याच कार्यकर्त्याकडे सोपविल्याचा सूरही आवळला जात आहे. भोकरदनमध्ये माजी आ. चंद्रकांत दानवे यांच्यामुळे राष्ट्रवादी बळकट असली तरी इतर ठिकाणी मात्र पक्षाची वाताहत दिसून येते.

उसाचे राजकारणकाही वर्षांपूर्वी टोपे यांच्याच कारखान्याला ऊस द्यावा लागायचा. परंतु, त्यातही आपला आणि विरोधक असे मोठे राजकारण केल्याचा आरोप वेळोवेळी शेतकऱ्यांसह विरोधकांनी केला आहे. त्याला पर्याय म्हणून सतीश घाटगे आणि नंतर हिकमत उढाण यांनीही आपापले युनिट सुरू करून ऊस उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि टोपे यांच्या कारखान्यापेक्षा अधिक दर देण्याचा प्रयत्न केल्याचा सूरही निघतो. त्यामुळे उसाच्या राजकारणाचेही उत्तर निवडणुकीत मविआच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना द्यावे लागणार असल्याचे सांगितले जाते.

अजित पवारांनी दिल्या होत्या कानपिचक्याराजेश टोपे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार जालन्यात आले होते. टोपे यांच्या घराकडे जाताना रस्त्यांची दुरवस्था आणि शहरातील अस्वच्छता पवारांच्या नजरेत आली होती. त्यावेळी अजित पवार यांनीही टोपे यांच्या घरीच कानपिचक्या दिल्याची चर्चा होती. या कानपिचक्यांवर राष्ट्रवादीच्या नाराज गटात चांगलीच चर्चा रंगली होती.

गत निवडणुकीतील मतदान: २०१९राजेश टोपे- राष्ट्रवादी- १,०७,८४९हिकमत उढाण- शिवसेना- १,०४,४४०विष्णू शेळके- वंचित- ९२९३

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकghansawangi-acघनसावंगी