शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

३२ कोटींचा कर थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:49 AM

मालमत्ता आणि अन्य करापोटी जिल्ह्यातील चार नगर परिषदांसह चार नगरपंचायतींचा तब्बल ३२ कोटींचा कर थकला आहे.

जालना : मालमत्ता आणि अन्य करापोटी जिल्ह्यातील चार नगर परिषदांसह चार नगरपंचायतींचा तब्बल ३२ कोटींचा कर थकला आहे. यामध्ये मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी सर्वाधिक आहे. थकबाकीच्या तुलनेत वसुलीचे प्रमाण केवळ २० टक्के आहे.शासनाकडून मिळणारा विकास निधी, अनुदानाबरोबरच स्थानिक कर वसुलीतून नगर पालिकेला मोठे उत्पन्न मिळते. याचा उपयोग विकास कामांसह नागरी सुविधांशी निगडित आवश्यक खर्च भागविण्यासाठी केला जातो. मात्र मागील काही वर्षांमध्ये जिल्ह्यातील जालना, अंबड, परतूर, भोकरदन या नगर परिषदांचे कर वसुलीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. वसुलीची टक्केवारी वाढण्याऐवजी दरवर्षी कमी होत आहे. त्यामुळे अनेक शासकीय योजनांचा लोकवाटा भरणेही या नगर परिषदांना कठीण जात आहे. शिवाय पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती या कामांवरही याचा विपरीत परिणाम होत आहे. जालना नगर परिषदेचा थकबाकीचा आकडा २० कोटींवर पोहोचला असून, वसुलीचे प्रमाण केवळ चार कोटींपर्यंत आहे. अंबड नगर परिषदेचा तब्बल पावणेआठ कोटींचा कर थकित असून, वसुलीचा आकडा सव्वा कोटीवर अडकला आहे. परतूर व भोकरदन नगरपषिदेच्या वसुलीचे प्रमाण असमाधानकारक आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या जाफराबाद, बदनापूर, घनसावंगी आणि मंठा नगरपंचायतींच्या कर वसुलीचे प्रमाण वीस टक्क्यांवर अडकले आहे. वीजबिलाची थकबाकी न भरल्यामुळे मागील आठवड्यात मंठा पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. आर्थिक अडचणींमुळे असे प्रकार वारंवार घडत आहेत. सर्व नगरपालिका व नगर पंचायतींनी मार्चअखेर कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आदेश विभागीय आयुक्तांनी मुख्याधिका-यांना दिले होते. मात्र त्यासाठी आवश्यक प्रयत्न झालेले दिसत नाहीत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ३२ कोटी ६८ लाख, तीन हजार रुपये असणा-या थकबाकीच्या तुलनेत वसुलीचा आकडा सहा कोटी ८४ लाख ७३ लाख इतका आहे. आठही पालिकांच्या कर वसुलीचे हे प्रमाण केवळ २०.९५ इतके आहे. आता मार्चअखेर कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणे फारच कठीण दिसत असून, पालिका क्षेत्रातील विकास कामांना याचा फटका बसणार आहे.----------------कर वसुली कमी असेल विकास कामांसाठी मिळणारा निधी व अनुदानात कपात करण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. त्यामुळे किमान ८० टक्के कर वसुली पूर्ण करा, अशी नोटीस विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींना दिली होती. आतापर्यंत केवळ २१ टक्केच वसुली पूर्ण झाली आहे. मार्चअखेर वसुली वाढविण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न करावेत.- उमेश कोटीकर, प्रशासकीय अधिकारी, नगरपालिका प्रशासन.