शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

३६ गावांना महापुराची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:36 AM

अंबड, परतूर व घनसावंगी तालुक्यांमधील नदीकाठच्या ३६ गावांमधील नागरिकांना महापुराची धास्ती बसली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून पाण्याचा विर्सग करण्यात आल्याने जायकवाडी धरणाच्या जलसाठ्याची १०० टक्क्यांकडे वाटचाल सुरू आहे. यामुळे अंबड, परतूर व घनसावंगी तालुक्यांमधील नदीकाठच्या ३६ गावांमधील नागरिकांना महापुराची धास्ती बसली आहे.नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून येत्या एक दोन दिवसांमध्ये पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. मात्र, जायकवाडी धरणाचा जलसाठा ८१ टक्क्यांहून अधिक झाला आहे. यामुळे यापुढे नाशिक व अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाऊस पडताच धरण पूर्णक्षमतेने भरून गोदावरीला पूर येऊ शकतो, जालना जिल्ह्यात गोदावरी नदीचा ६० किलोमिटरचा किनारा लाभलेला असून सन २००६ मध्ये गोदावरी नदीला पूर आला होता.यावेळी जालना जिल्ह्यातील ३६ गावांना पूराचा तडाखा बसला होता. यामध्ये घनसावंगीत तालुक्यातील १८ गावे अंबड तालुक्यातील १३ गावे व परतूर तालुक्यातील पाच गावांचा समावेश होता. यावेळी अनेकांचे संसार उद्धवस्त झाले होते. शेकडो एक्कर जमीन पाण्याखाली गेली होती. हीच परिस्थिती पुन्हा उद्भवत तर नाही ना असा प्रश्न आता ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.२००६ मध्ये गोदावरीला आलेल्या पुराची पुनरावृत्ती पुन्हा होवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने त्यावेळी काही गावांचे पूर्ण तर काही गावांचा अंशत: पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव तयार केला होता.विशेष म्हणजे घनसावंगी तालुक्यातील काही गावांचा आराखडा तयार करण्यात आला होता. यात ३६३० कुटूंबांचा समावेश होता. या कुटूंबांना ४९६ हेक्टर ३७ गुंठे जमीन संपादित करण्यासाठी व नागरि सुविधांसाठी २००६ नुसार ७६४ कोटी साठ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.यामध्ये अंबड तालुक्यातील गोंदी, कुरण, गंगा चिंचोली, साष्ट पिंपळगाव, बळेगाव, आपेगाव, शहागड, पाथरवाला, हसनापूर, कोठाळा, इंदलगाव, साडेगाव आदी गावे आहेत. घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी, रामसगाव, सौंदल गाव, लिंगेवाडी, गुंज बुद्रुक, रामसगाव, मुद्रेगाव, कोटी, शेवता, अंतरवाली टेंभी, बानेगाव, उक्कडगाव, शिवणगाव, बादली, राजाटाकळी, मंगरूळ, श्रीपत धामणगाव तर परतूर तालुक्यातील गोळेगाव, संकल्प पुरी, गंगा किनारा, चांगतपूरी, सावरगाव बुद्रुक आदी गावांचा समावेश आहे.

टॅग्स :floodपूरDamधरणWaterपाणीMigrationस्थलांतरण