शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

भर पावसाळ्यातही १०१ टँकर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 01:00 IST

भर पावसाळ्यात आॅगस्ट महिन्याच्या अखेरच्या टप्प्यातही तब्बल १०१ टँकरद्वारे ८९ गावे १८ वाड्यांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. परिणामी भर पावसाळ्यात आॅगस्ट महिन्याच्या अखेरच्या टप्प्यातही तब्बल १०१ टँकरद्वारे ८९ गावे १८ वाड्यांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पावसाळ्याचा तिसरा महिना संपत आला असून, अद्यापही मोठा पाऊस न झाल्याने सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे.सततच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सर्वसामान्यांनाही पाण्याच्या प्रश्नाने ग्रासले आहे. यंदा मोठा पाऊस पडण्याची अपेक्षा जिल्हावासियांना होती. मराठवाडा वगळता राज्यात इतरत्र दमदार पाऊस झाला असून, पूर परिस्थितीमुळे सांगली, सातारा, कोल्हापूर भागात अतोनात नुकसान झाले आहे. या उलट जालना जिल्ह्यातील गावा-गावातील पाणीटंचाईचा प्रश्न आजही कायम आहे.मध्यंतरी भोकरदन तालुक्याच्या अर्ध्या भागात दमदार पाऊस झाला. मात्र, अर्ध्याहून अधिक तालुक्यात आजही पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे. इतर तालुक्यांमधील पाण्याची परिस्थिती वेगळी नाही.मे महिन्यात जिल्ह्यात ६०० वर टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात होता. मध्यंतरी झालेल्या पावसानंतर प्रशासनाकडून जवळपास ५०० टँकर बंद करण्यात आले आहेत. असे असले तरी बदनापूर, परतूर, अंबड व घनसावंगी तालुक्यातील ८९ गावे आणि १८ वाड्यांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यात बदनापूर तालुक्यातील १० गावांना ११ टँकरद्वारे, परतूर तालुक्यातील ११ गावांना ११ टँकरद्वारे अंबड तालुक्यातील ४६ गावे, ११ वाड्यांना ५४ टँकरद्वारे तर घनसावंगी तालुक्यातील २२ गावे आणि ७ वाड्यांना २५ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. दरम्यान, पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. आगामी एक महिन्यात दमदार पाऊस न झाल्यास पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.३३ गावांना अधिग्रहणाचा आधारजिल्ह्यातील ३३ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर टँकर भरण्यासाठी ४२ अधिग्रहणे करण्यात आली आहेत. टँकर व गावांसाठी एकूण ७५ अधिग्रहणे जिल्ह्यात करण्यात आली आहेत. तर काही टँकर ज्या जलशुध्दकरण केंद्रात पाणी उपलब्ध आहे, तेथे भरण्यात येत आहेत.एक लाख ९१ हजार नागरिकांना आधारजालना जिल्ह्यातील ८९ गावे, १८ वाड्यांना १०१ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या ठिकाणच्या तब्बल १ लाख ९१ हजार ४४३ नागरिकांना टँकरच्या पाण्याचा आधार मिळाला आहे.९७ खासगी टँकरप्रशासनाकडून जिल्ह्यात १०१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यातील ९७ टँकर खासगी असून, केवळ ४ टँकर शासकीय आहेत. या टँकरच्या २२५ खेपा मंजूर असून, प्रत्यक्षात १८९ फेºया झाल्या आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूक