शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

शहागडमध्ये सशस्त्र दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:29 IST

अंबड तालुक्यातील शहागड येथील एका व्यावसायिकाच्या घरावर शनिवारी पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला.

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : अंबड तालुक्यातील शहागड येथील एका व्यावसायिकाच्या घरावर शनिवारी पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला. रोख रक्कम, दागिन्यांसह तब्बल २६ लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.अंबड तालुक्यातील शहागड येथील व्यावसायिक माणिकलाल जैस्वाल यांचा मोठा मुलगा मनोज जैस्वाल हा कामानिमित्त औरंगाबादला गेला होता. तर छोटा मुलगा, एक मुलगी व पती-पत्नी हे चार सदस्य घरी होते. माणिकलाल जैस्वाल हे नेहमीप्रमाणे दोन बिअरबार, एक देशी दारू दुकान, हॉटेल बंद करून शुक्रवारी रात्री घरी झोपले होते.शुक्रवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात दरोडेखोरांनी जैस्वाल यांच्या घराबाहेर पाळत ठेवली. तर चार दरोडेखोरांनी घरातील व परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तोडून, काहींचे तोंड फिरवून, तर काहींचे वायर डिस्कनेक्ट केला. बांधकामासाठी वापरात असलेल्या सीडीचा वापर करत किचन खिडकीची जाळी काढून घरात प्रवेश केला. तद्नंतर हॉलमध्ये प्रवेश करून प्रथम छोटा मुलगा, मुलगी असलेल्या खोलीत प्रवेश केला. मुलांजवळील मोबाईल हिसकावून घेत दार बाहेरून बंद केले. तद्नंतर माणिकलाल जैस्वाल असलेल्या रूमचे दार लावून घेत त्यांच्या पत्नी रेखा जैस्वाल असलेल्या बेडरूम मध्ये प्रवेश केला.त्यांनी आरडाओरडा करु नये म्हणून त्याच्या छातीवर पाय ठेवून तलवारीचा धाक दाखविला. कपाटातील तिजोरी उघडून दवाखान्यात जाण्यासाठी ठेवलेले ४ लाख रुपये, बँकांना सुट्ट््या असल्याने हॉटेल, बार व्यवसायाचे ३ लाख रुपये, तर घरातील नवे, जुने असे तब्बल ५० तोळे सोन्याचे दागिने चोरून घराच्या पाठीमागे असलेल्या शेतीमधून पलायन केले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.२५ किलोमीटर अंतर पिंजलेघटनेनंतर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, डीवायएसपी सी.डी.शेवगण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर, एडीएसचे पोनि यशवंत जाधव, पोलीस नाईक संजय मगरे, एपीआय शिवानंद देवकर, उपनिरीक्षक हनुमंत वारे, धनंजय कवाडे, गोपनीय शाखेचे पो. कॉ.महेश तोटे, बाबा डमाळे आदींनी घटनास्थळाचा पंचनामा केला.त्यानंतर दरोडेखोरांच्या शोधार्थ वडी (ता.अंबड) ते गढी (जि.बीड) असा २५ किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. मात्र, चोरटे हाती लागले नाहीत.तीन वर्षांपूर्वीची आठवण उजागरमाणिकलाल जैस्वाल यांच्या बाजूला राहणारे अब्दुल कादर कुरेशी यांच्या घरी गत तीन वर्षांपूर्वी असाच नियोजनबद्ध दरोडा टाकण्यात आला होता. माणिकलाल जैस्वाल यांच्या घरी पडलेल्या दरोड्याचा घटनाक्रम तसाच आहे. त्यामुळे कुरेशी यांच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांनीच तीन वर्षानंतर जैस्वाल यांच्या हालचालींवर नजर ठेवून नियोजनबद्ध दरोडा टाकल्याची परिसरात चर्चा आहे.घटनेनंतर आरडाओरड ऐकून परिसरातील हॉटेल व्यावसायिक, शेजारी धावून आले. घटना समजताच उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते.तातडीने श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वानाने दरोडा स्थळापासून वाळकेश्वर च्या मुख्य रस्त्यापर्यंतच माग काढला. मात्र तेथे श्वान घुटमळले.

टॅग्स :DacoityदरोडाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस