लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील नेहरूरोडवरील सोन्या-चादींचे व्यापारी अजय लक्ष्मणराव कपाळे यांच्या दुकानातील गल्लयातील अडीच लाख रूपये चोरट्यांनी लंपास केले आहेत.ही घटना सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. अजय कपाळे यांचे राजूरेश्वर ज्वेलर्स नावाने येथे दुकान आहे. ते दुकानात कोणी नसताना जवळच असलेल्या दुसºया दुकानात सोने गाळण्यासाठी गेले आहेत. ही संघी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गल्ल्यातील रोख अडीच लाख रूपये लंपास केले. याची माहिती त्यांनी सदरबाजार पोलीसांसह स्थानिक गुन्हे शाखेला दिल्याचे ते म्हणाले. रात्री उशिरापर्यंत यात गुन्हा दाखल झाला नव्हता.
सराफा व्यापाऱ्याचे अडीच लाख रु. लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 01:19 IST