शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

अवैध उपसा होणारी 2 हजार ब्रास वाळू जप्त, गुन्हे शाखेची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 17:49 IST

स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर यांना खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली

जालना : बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील अवैध वाळू साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी कारवाई केली. यावेळी ६८ लाख २२ हजार रुपयांची २२७४ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी अमोल मदन, केशवराव व्यंकट मदन (रा. केळीगव्हाण, ता. बदनापूर) यांच्याविरुध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर यांना खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की, केळीगव्हाण येथे गावालगत मोठ्या प्रमाणात अवैध वाळू साठा करुन ठेवला असून, त्याची चोरटी विक्री केली जात आहे. या माहितीवरुन सदर ठिकाणी पाहाणी केली असता, तेथे मोठ्या प्रमाणात वाळूसाठा आढळून आला. सदर वाळूच्या मालकाबाबत विचारणा केला असता, सदर वाळूचा अवैध साठा हा अमोल मदन व केशवराव मदन यांचा असल्याचे समजले. महसूल विभागाचे पथक बोलवून या वाळूसाठ्याची मोजमाप करुन ५० लाख २२ हजार रुपयांची १६७४ ब्रास वाळू  जप्त केली. तसेच केळीगव्हाण शिवारातीलच राजेवाडी साठवण तलावात अवैध वाळूसाठा आढळला. हा वाळूसाठाही  अमोल मदन व केशवराव मदन यांचा असल्याचे समजले. या वाळूचा पंचनामा करुन मोजमाप करण्यात केली. येथून १८ लाख रुपयांची ६०० ब्रास वाळू जप्त करण्यात आली. या दोन्ही ठिकाणाहून ६८ लाख २२ हजार रुपयांची २ हजार २७४ रुपयांची वाळू जप्त करण्यात आली आहे. 

पोउपनि ज्ञानेश्वर सानप यांच्या फिर्यादीवरुन अमोल केशवराव मदन, केशवराव मदन यांच्या विरुध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  पोनि. राजेंद्रसिंह गौर,  पोउपनि. ज्ञानेश्वर सानप, सॅम्युअल कांबळे, प्रशांत देशमुख, विनोद गडदे, गोकुळसिंग कांयदे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, किशोर जाधव, संजय राऊत, शमशाद पठाण, मंडळअधिकारी यु. पी. कुलकर्णी, तलाठी के. के. ढाकणे यांनी केली.

टॅग्स :JalanaजालनाsandवाळूCrime Newsगुन्हेगारी