शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

गरिमाच्या संचालकांनी गरिबांच्या पैशातून घेतली २०० एकर जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:36 IST

गुंतवणूकदारांच्या रकमेतून गरिमा रिअल इस्टेट कंपनीच्या संचालकांनी रत्नागिरी जिल्ह्यात चक्क २०० एकर शेतजमीन खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मोलमजुरी करून बचत केलेले पैसे तीन वर्षात दुप्पट करून देण्याचे आमिष दाखविल्याने जिल्ह्यातील हजारो कष्टकऱ्यांनी आपल्या घामाचे पैसे गरिमा रिअल इस्टेट कंपनीत गुंतविले होते. दुप्पट पैसे तर सोडाच; परंतु मुद्दलही न मिळाल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले होते. तर दुसरीकडे या गुंतवणूकदारांच्या रकमेतून गरिमा रिअल इस्टेट कंपनीच्या संचालकांनी रत्नागिरी जिल्ह्यात चक्क २०० एकर शेतजमीन खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे.जालना जिल्ह्यात २०१० ते २०१५ या दरम्यान गरिमा रिअल इस्टेट कंपनीने जवळपास अडीच हजार गुंतवणूकदारांकडून प्रथमदर्शनी अंदाजित साडेचार कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती. त्या पैकी ९०० जणांची साधारपणे दोन कोटी ९ लाख रूपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या गरिमा कंपनीने जालन्या प्रमाणेच औरंगाबाद जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनही गंडा घातला आहे. या प्रकरणी जालन्यातील आर्थिक गुन्हे शाखेने माजी आ. बनवारीलाल कुशवाह याला ३० आॅगस्टला जालना येथील जिल्हा न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी त्याला पाच सप्टेबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या पाच दिवसांच्या पोलीस कोठडी दरम्यान, कुशवाह यांनी गुंतवणूक दारांच्या पैशातून रत्नागिरी जिल्ह्यातील लांजिया तालुक्यात जवळपास २०० एकर शेतजमीन घेतल्याचे सांगितले. या माहितीवरून पोलिसांनी रत्नागिरी येथे जाऊन १८ रजिस्ट्री आणि सातबारा उताºयांची माहिती आणली आहे. या जमिनीची नेमकी किंमत किती होते, याचा तपशील मिळविण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, बुधवारी बनवारीलाल कुशवाह याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असून, त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.गेल्याच महिन्यात औरंगाबाद पोलिसांनी गरिमाच्या याच माजी आ. बनवारीलाल कुशचाहला राजस्थानमधील धवलपूर येथून फसणूक प्रकरणात अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्याचवेळी जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेने पत्र व्यवहार करून हाच संशयित आरोपी आम्हालाही हवा असून, त्याला आमच्याकडे स्वाधीन करावे अशी मागणी केली होती. मात्र ती नाकारण्यात आली. विशेष म्हणजे यामुळे औरंगााद नंतर जालन्याच्या पोलिसांना धवलपूर येथे फेरा मारून कुशवाहला अटक करून जालन्यात आणावे लागले. यामुळे एक प्रकारे शासनाचा प्रवास भत्त्यासह अन्य खर्च वाढला आहे. समन्वयाचा अभाव असल्यानेच हे असे घडल्याचे दिसून आले.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी