शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

४९५ कर्ज खात्यात अडीच कोटी वर्ग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 00:02 IST

महाआघाडी शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत गत चार दिवसात ७९२ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून योजनेचा लाभ घेतला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महाआघाडी शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत गत चार दिवसात ७९२ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून योजनेचा लाभ घेतला आहे. यातील ४९५ शेतकऱ्यांच्या कर्ज कर्जखात्यावर २ कोटी ५० लाख ३९ हजार ८१९ रूपयांची रक्कम शासनाकडून वर्ग करण्यात आली आहे.महाआघाडी शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ८१ हजार २६७ शेतक-यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. शासनाच्या प्राथमिक यादीत २४ फेब्रुवारी रोजी जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी व टेंभुर्णी या दोन गावांमधील ११०२ शेतक-यांची यादी प्रसिध्द झाली होती. या प्रक्रियेत मागील चार दिवसांमध्ये गुरूवारपर्यंत ७९२ शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण करून या योजनेचा लाभ घेतला आहे. पैकी ४९५ शेतक-यांचे २ कोटी ५० लाख ३९ हजार ८१९ रूपये शासनाकडून संबंधित बँकेच्या कर्ज खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. यात जिल्हा बँकेतील १५० शेतक-यांचे ४१ लाख ५८ हजार ८७७ रूपये, बँक आॅफ महाराष्ट्रच्या १९२ शेतक-यांचे १ कोटी ५७ लाख रूपये, एसबीआयच्या १२० शेतक-यांचे २५ लाख रूपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ११ शेतक-यांचे १४ लाख २० हजार १०९ रूपये, बँक आॅफ बडोदाच्या एका शेतक-याचे ३९ हजार रूपये असे एकूण २ कोटी ५० लाख ३९ हजार ८१९ रूपये रक्कम कर्ज खात्यात वर्ग करण्यात आली आहे.उर्वरित शेतक-यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.जिल्ह्यातील २५ शेतक-यांच्या तक्रारीशासनाच्या कर्जमुक्ती योजनेंतर्गत बँक खाते, आधार क्रमांकात चुका असल्याची तक्रार दोन गावातील २५ जणांनी केली आहे. यातील तीन तक्रारी जिल्हा समितीकडे आल्या असून, उर्वरित २२ तक्रारी तहसीलदारांकडे करण्यात आल्या आहेत. या तक्रारींचेही तातडीने निरसन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.आज दुसरी यादीयेण्याची शक्यताशासनाच्या कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्राथमिक यादीत दोन गावातील ११०२ शेतक-यांची यादी प्रसिध्द झाली होती. शासन निर्णयानुसार आज २८ फेब्रुवारी रोजी दुसरी यादी प्रसिध्द होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरीfundsनिधी