शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

ग्रामीण भागातील ११२ रस्त्यांचे उजळणार भाग्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 00:27 IST

ग्रामीण भागाला जोडणाऱ्या जिल्ह्यातील ११२ रस्त्यांच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ३० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे खड्ड्यांनी ग्रासलेल्या या रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ग्रामीण भागाला जोडणाऱ्या जिल्ह्यातील ११२ रस्त्यांच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ३० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे खड्ड्यांनी ग्रासलेल्या या रस्त्यांचे भाग्य उजळणार असून, वाढलेले अपघाताचे प्रमाणही कमी होणार आहे.जिल्ह्यातील गावा-गावांना जोडणाºया रस्त्यांची मोठी दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यांवरुन वाहने चालवणे म्हणजे चालकांसाठी कसरतच! रस्त्याची झालेली अवस्था आणि वाढलेले अपघात यामुळे या रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी वेळोवेळी जिल्हा परिषदेकडे करण्यात आली होती. जिल्हा परिषदेने निधीसाठी वरिष्ठस्तरावरही पाठपुरावा केला होता.या पाठपुराव्याला यश आले असून, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ११२ रस्त्यांसाठी ३० कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन करण्यात आले आहे. रस्त्यांच्या या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थिती झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, यावर्षीच या रस्त्यांच्या कामांना सुरूवात होणार असून, तसे नियोजनही करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी लोकमतशी बोलतांना दिली.जळगाव ते आडगाव, जामखेड ते पाचोड, पिंपरखेड ते अरगडे गव्हाण, किर्तापूर ते किर्तापूर तांडा, हिवरखेडा ते आकणी, टकले पोखरी ते सेवली, श्रीष्टी ते कºहाळा ते ईजिमा, कोकाटे हादगाव ते लिंबी, मंठा टोकवाडी तांडा ते पांगरी खु, भारज पासोडी, भारज ते आढा, धावडा ते नाटवी, पारध खु, कुंभारी ते देवपिंपळगाव, गाढेसावरसागाव ते माळी पिंपळगाव, पाथरवाला बु, पांगरी गोसावी, बाजीउम्रद ते बाजीउम्रद तांडा, दहीगाव ते जळगाव सपकाळ, मोतीगव्हाण ते साळेगाव, खडकावाडी, देवगाव खवणे ते नायगाव, वाढोणा ते रोहिणा, गोळेगाव ते सावंगी, अकोला तांडा, पानशेंद्रा ते श्रीकृष्णनगर, वंजारउम्राद ते दत्तमंदीर, मठारोड ते धोगडे वस्ती, धारकल्याण ते आनदवडी, गाढेसावरगाव ते माळी पिंपळगाव अशा ११२ रस्त्यांची कामे होणार आहेत.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागroad transportरस्ते वाहतूकfundsनिधी