धावडा ग्रामपंचायत निवडणुकीत युतीचे १० उमेदवार विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:31 IST2021-01-20T04:31:04+5:302021-01-20T04:31:04+5:30

धावडा गावातील वॉर्ड क्रमांक एक, तीन, चार व पाचमध्ये भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचे १० उमेदवार विजयी झाले आहेत. वॉर्ड ...

10 candidates of the alliance won in Dhavda Gram Panchayat election | धावडा ग्रामपंचायत निवडणुकीत युतीचे १० उमेदवार विजयी

धावडा ग्रामपंचायत निवडणुकीत युतीचे १० उमेदवार विजयी

धावडा गावातील वॉर्ड क्रमांक एक, तीन, चार व पाचमध्ये भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचे १० उमेदवार विजयी झाले आहेत. वॉर्ड क्रमांक दोन, सहा व पाचमध्ये एक असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सात सदस्य निवडून आलेले आहेत. वॉर्ड एकमध्ये सुगरणबाई खैरे, धनंजय तबडे, ईश्वर सपकाळ, वॉर्ड क्रमांक तीन मध्ये इकबाल पठाण, जयाबाई भडगे, वाॅर्ड क्रमांक चारमध्ये दिलीप वाघ, रामराव पवार, गंगूबाई बोराडे, वाॅर्ड क्रमांक पाचमध्ये विद्यमान सरपंच बेलाअप्पा पिसोळे, द्वारकाबाई निकाळजे हे विजयी झालेले उमेदवार युतीचे आहेत. तर वॉर्ड क्रमांक दोनमध्ये रेहाना सय्यद नूर, लीलाबाई देवकर, गजानन गवळी, वाॅर्ड क्रमांक पाचमध्ये निर्मला तबडे, वाॅर्ड क्रमांक सहामध्ये जुमान चाऊस, लक्ष्मीबाई आहेर व नसीमाबी शब्बीर पठाण यांचा विजय झाला आहे. हे उमेदवार राष्ट्रवादी पक्षाचे आहेत. युतीच्या विजयी उमेदवारांची गावातून मिरवणूक काढून फटाके फोडून आनंदोत्साह साजरा केला.

Web Title: 10 candidates of the alliance won in Dhavda Gram Panchayat election