शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

झाकीर नाईकने मानले महातीर यांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 04:39 IST

इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा संस्थापक व वादग्रस्त प्रचारक झाकिर नाईक याला भारताच्या हवाली करण्यास मलेशियाने नकार दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशीच त्याने त्या देशाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

कौलालंपूर - इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा संस्थापक व वादग्रस्त प्रचारक झाकिर नाईक याला भारताच्या हवाली करण्यास मलेशियाने नकार दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशीच त्याने त्या देशाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. या संदर्भातील छायाचित्र नाईक याच्या वकिलांनी रविवारी जारी केले आहे.झाकिर नाईक २०१६ साली भारतातून मलेशियाला पळून गेला. मलेशियाने त्याला कायमस्वरूपी नागरिकत्व बहाल केले आहे. त्याच्या कृत्यांनी मलेशियामध्ये जोवर काही समस्या निर्माण होत नाहीत, तोवर आम्ही त्याला भारताच्या हवाली करणार नाही असे महातीर मोहम्मद यांनी म्हटले होते. दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरविल्याचा, तसेच विद्वेष फैलाविणारी भाषणे केल्याचा आरोप भारतीय तपासयंत्रणांनी झाकीर नाईकवर ठेवला आहे.झाकीरला भारताच्या हवाली न करण्याच्या निर्णयाचे पार्टी प्रिभूमी बेरसातू मलेशिया (पीपीबीएम) या सत्ताधारी पक्षाने समर्थनच केले आहे. झाकीरला भारताकडे सोपविल्यास उघुर मुस्लिमांना चीनच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेणेही मलेशियाला भाग पडेल. त्यामुळे महातीर मोहम्मद यांनी असा निर्णय घेतला असावा. पीपीबीएमचे नेते रईस हुसेन यांनी सांगितले की, झाकिर नाईकचे कार्य व भाषणे यात आम्हाला आक्षेपार्ह आढळलेले नाही. आपण भारतात परतणार असल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे झाकिर नाईक याने एका निवेदनात म्हटले होते.

टॅग्स :Zakir Naikझाकीर नाईकnewsबातम्या