रामदेवबाबा यांना केंद्राने दिली ‘झेड’ दर्जाची सुरक्षा
By Admin | Updated: November 18, 2014 00:22 IST2014-11-18T00:22:14+5:302014-11-18T00:22:14+5:30
रामदेवबाबा यांच्यावर त्यांच्या विरोधकांकडून कोणत्याही क्षणी हल्ला केला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना ही ‘झेड’ सुरक्षा देण्यात आल्याचे समजते.

रामदेवबाबा यांना केंद्राने दिली ‘झेड’ दर्जाची सुरक्षा
नवी दिल्ली : योगगुरू रामदेवबाबा यांना केंद्र सरकारतर्फे ‘झेड’ दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली. रामदेवबाबा यांच्यावर त्यांच्या विरोधकांकडून कोणत्याही क्षणी हल्ला केला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना ही ‘झेड’ सुरक्षा देण्यात आल्याचे समजते.
सुरक्षा संस्थांकडून मिळालेली माहिती आणि रामदेवबाबा यांच्या जिवाला असलेला वाढता धोका या आधारावर केंद्रीय गृहमंत्रालयाने बाबांना ही सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. आता रामदेवबाबा यांना तात्काळ निमलष्करी दलाचे कमांडो देण्यात येतील. सुरक्षा दलाचे किमान ४० कमांडो त्यांच्या सुरक्षेसाठी २४ तास तैनात राहतील, असे सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)