शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकपाठोपाठ यूट्युब अडचणीत; बालसुरक्षा कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 10:39 IST

२३ संस्थांची यूट्युबविरोधात तक्रार

केंब्रिज अॅनॅलिटिका डेटा चोरी प्रकरणामुळे फेसबुकवर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली असताना आता यूट्युबदेखील अडचणीत आले आहे. अमेरिकेतील २३ संस्थांनी यूट्युबविरोधात यूएस फेडरल ट्रेड कमिशनकडे तक्रार दाखल केली आहे. १३ वर्ष वयापर्यंतच्या मुलांची वैयक्तिक माहिती गोळा करुन बालसुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप या संस्थांनी यूट्युबवर केला आहे. यूट्युबवर व्हिडीओ पाहणाऱ्या १३ वर्षांखालील मुलांची माहिती गुगलकडून गोळा केली जाते. या मुलांचे लोकेशन, डिव्हाईस, फोन नंबर अशी माहिती गोळा करुन त्यांना इतर संकेतस्थळांवर ट्रॅक केले जाते. याशिवाय ही माहिती गोळा करताना मुलांच्या पालकांची परवानगीदेखील घेतली जात नाही. यामुळे अमेरिकेतील चिल्ड्रन्स ऑनलाईन प्रायव्हसी प्रोटेक्शन अॅक्टचे (Coppa) उल्लंघन होत असल्याचे तक्रारदार संस्थांचे म्हणणे आहे. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी लढणाऱ्या संस्था, जागरुक ग्राहक आणि वैयक्तिक माहितीचे संरक्षण व्हावे, अशी भूमिका असलेले गट अशा एकण २३ संस्थांनी मिळून यूट्युबविरोधात तक्रार दाखल केली आहे. या संस्थांच्या ग्रुपमध्ये कॅम्पेन फॉर कमर्शियल-फ्री चाईल्डहूड (CCFC) आणि सेंटर फॉर डिजिटल डेमोक्रसी या महत्त्वाच्या संस्थांचाही समावेश आहे. त्यामुळे यूट्युबविरोधातील तक्रारीची गंभीर दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. ५ कोटी वापरकर्त्यांची माहिती लिक झाल्याने काही दिवसांपूर्वीच फेसबुकवर टीकेची झोड उठली होती. डेटा लिक झाल्याने निर्माण झालेले हे वादळ अद्याप शमलेले नाही. केंब्रिज अॅनॅलिटिका या कंपनीला वापरकर्त्यांचा डेटा दिल्याचा आरोप फेसबुकवर आहे. याप्रकरणी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने माफीदेखील मागितली होती. आता फेसबुकपाठोपाठ यूट्युबदेखील अडचणीत सापडल्याने एकच खळबळ माजली आहे.  

टॅग्स :YouTubeयु ट्यूबFacebookफेसबुकCambridge Analyticaकेम्ब्रिज अ‍ॅनालिटिका