तुझा झगा गं वा-यावरती उडतो, मेट गाला 2017मध्ये प्रियंका चोप्राचीच चर्चा
By Admin | Updated: May 2, 2017 16:12 IST2017-05-02T11:00:33+5:302017-05-02T16:12:42+5:30
सेक्सी अवतारामुळे प्रियंका चोप्रानं हॉलिवूडमधील मोठ-मोठ्या अभिनेत्रींनाही मागे सोडलं आहे. तिच्या या भन्नाट लुकची आंतरराष्ट्रीय मीडियानं खूप वाहवाई केली आहे.

तुझा झगा गं वा-यावरती उडतो, मेट गाला 2017मध्ये प्रियंका चोप्राचीच चर्चा
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राला आंतरराष्ट्रीय सोहळ्यात आपल्या लुक्सनं लोकांवर कशी मोहिनी घालायची व हॉलिवूडकरांमध्येही स्वतःची वेगळी छाप कशी पाडायची?, हे चांगलंच माहिती आहे. मग ऑस्कर अॅवॉर्ड असो किंवा गोल्डन ग्लोब्स... प्रियंका आपल्या ड्रेस, मेकअप आणि अदांमुळे नेहमीच चर्चेत असते.
नुकतीच प्रियंका "मेट गाला 2017"मध्ये सहभागी झाली होती. नेहमी प्रमाणे या वेळेसही तिनं हॉलिवूड कलाकारांमध्ये स्वतःची छाप जरा हटके पद्धतीने पाडली. सेक्सी आणि हॉट लुकनं प्रियंकानं उपस्थितांना घायाळ केलं. अमेरिकेतील टीव्ही मालिका क्वांटिकोमध्ये आपल्या अभिनयाने लोकांना घायाळ करणा-या प्रियंकानं कॉलर कोट परिधान केला होता.
या सोहळ्यात प्रियंकाने रेड कार्पेटवर ‘राल्फ लॉरेनच्या’ ट्रेन्च कोट खाकी रंगातील गाउन परिधान केला होता. या गाउनसोबत तिनं काळ्या रंगाचे बुटही घातले होते. डोळ्यांवर केलेला स्मोकी मेकअपमुळे ती आणखीनच मादक दिसत आहे. विशेष म्हणजे
प्रियांकाने घातलेला हा गाऊन जगातला सर्वात लांबलचक गाउन असल्याचे बोलले जात आहे.
आपल्या या सेक्सी अवतारामुळे प्रियंकानं तर हॉलिवूडमधील मोठ-मोठ्या अभिनेत्रींनाही मागे सोडलं आहे. तिच्या या भन्नाट लुकची आंतरराष्ट्रीय मीडियानं खूप वाहवाई केली आहे. प्रियंका चोप्राचे या सोहळ्याला हजेरी लावणं यासाठीही विशेष मानले जाते कारण हॉलिवूडमधील मोजकेच सेलिब्रिटी यात सहभागी होतात.
दरम्यान, ही देसी गर्ल लवकरच हॉलिवूडमधील सिनेमा बेवॉचमध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला होता. हा सिनेमा भारतात 26 मे रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.