न्यूयॉर्कमधील दोन मांजरींची संपत्ती ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याखेरील राहणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 02:17 IST2017-09-25T02:17:10+5:302017-09-25T02:17:24+5:30
एखादा प्राणी खूप श्रीमंत आहे असे सांगितले, तर कोणीही ही बाब हसण्यावर नेईल, पण न्यूयॉर्कमधील दोन मांजरींची संपत्ती ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याखेरील राहणार नाही.

न्यूयॉर्कमधील दोन मांजरींची संपत्ती ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याखेरील राहणार नाही
एखादा प्राणी खूप श्रीमंत आहे असे सांगितले, तर कोणीही ही बाब हसण्यावर नेईल, पण न्यूयॉर्कमधील दोन मांजरींची संपत्ती ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याखेरील राहणार नाही. येथील टाइगर आणि ट्रॉय नावाच्या दोन मांजरींच्या नावावर चक्क दोन कोटी रुपये आहेत.
आता हे पैसे आले कोठून? असा प्रश्न उपस्थित होणारच. त्याचे झाले असे की, न्यूयॉर्कमध्ये राहणारी एलन ही महिला या मांजरींना आपल्या घरचे सदस्य मानत होती. त्यांच्या मुलाचा लहानपणीच मृत्यू झाला, तेव्हापासून त्या मांजरांमध्ये आपले मन रमवू लागल्या.
१९८९ मध्ये एलन यांच्या पतीचा मृत्यू झाला. त्यामुळे या दोन मांजरी याच त्यांना आधार होत्या. १९ कोटी रुपयांची मालकीन असणाºया एलन यांनी आपल्या मृत्युपत्रात या दोन मांजरांच्या नावावर दोन कोटी रुपये लिहून ठेवले.
आपल्या पश्चात या मांजरांना काही कमी पडू नये, हा त्यामागचा हेतू होता. २०१५
मध्ये ८८ व्या वर्षी एलन यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युपत्रानुसार, या मांजराच्या जबाबदारी एका ट्रस्टकडे देण्यात आली आहे.