येमेनमधून रॉकेट हल्ला, दोन भारतीय मजूर ठार

By Admin | Updated: December 20, 2015 22:53 IST2015-12-20T22:53:02+5:302015-12-20T22:53:02+5:30

हिंसाचाराची लागण झालेल्या येमेनमधून शनिवारी सायंकाळी सौदी अरेबियाच्या दक्षिण पश्चिम सीमेवरील नजरन या शहरात करण्यात आलेल्या रॉकेट हल्ल्यात दोन भारतीयांसह तीन जण ठार झाले

Yemen killed rocket attack, two Indian laborers killed | येमेनमधून रॉकेट हल्ला, दोन भारतीय मजूर ठार

येमेनमधून रॉकेट हल्ला, दोन भारतीय मजूर ठार

रियाध : हिंसाचाराची लागण झालेल्या येमेनमधून शनिवारी सायंकाळी सौदी अरेबियाच्या दक्षिण पश्चिम सीमेवरील नजरन या शहरात करण्यात आलेल्या रॉकेट हल्ल्या दोन भारतीयांसह तीन जण ठार झाले. भारतीय नागरिक ठार होण्याची यावर्षीची ही तिसरी घटना आहे.
सौदी अरेबियाची अधिकृत वृत्तसंस्था एसपीएने दिलेल्या माहितीनुसार दोन्ही भारतीय मृत हे कामगार आहेत. वृत्तात अधिक तपशील दिलेला नाही, तसेच भारतीय दूतावासानेही यावर काही भाष्य केलेले नाही. याबाबत तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Yemen killed rocket attack, two Indian laborers killed