जिओ टीव्हीच्या मालकाला तुरुंगवास
By Admin | Updated: November 27, 2014 02:35 IST2014-11-27T02:35:27+5:302014-11-27T02:35:27+5:30
पाकिस्तानातील जिओ टीव्ही या सर्वात मोठय़ा माध्यम कंपनीचे मालक, अभिनेत्री वीणा मलिक व तिचे पती यांना ईशनिंदेच्या आरोपावरून 26 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

जिओ टीव्हीच्या मालकाला तुरुंगवास
>ईशनिंदेचे प्रकरण : अभिनेत्री वीणा मलिकलाही 26 वर्षाची शिक्षा
इस्लामाबाद : पाकिस्तानातील जिओ टीव्ही या सर्वात मोठय़ा माध्यम कंपनीचे मालक, अभिनेत्री वीणा मलिक व तिचे पती यांना ईशनिंदेच्या आरोपावरून 26 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ईशनिंदाविषयक कार्यक्रमाचे प्रसारण केल्याबद्दल पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. जिओ टीव्ही व जंग वृत्तपत्रचे मालक मीर शकील उर रेहमान
यांच्यावर जिओ टीव्हीवर मे महिन्यात ईशनिंदाविषयक कार्यक्रमाचे प्रसारण करण्यास परवानगी दिल्याचा आरोप आहे. या कार्यक्रमात वीणा मलिक व बशीर यांचा खोटा विवाह लावताना धार्मिक गाणो लावण्यात आले होते.
न्या. शहाबाज खान यांनी वीणा मलिक, बशीर व कार्यक्रमाची संयोजिका शाईस्ता वाहिदी यांना प्रत्येकी 26 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
तसेच आरोपींना 13 लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, त्यांनी तो न दिल्यास त्यांची मालमत्ता विकून तो वसूल करावा, असे म्हटले आहे. या प्रकरणातील चारही आरोपींवर ईशनिंदेचा आरोप आहे असे न्या. शहाबाज खान यांनी निकालपत्रत म्हटले आहे.
निकालपत्र 4क् पानी असून, आरोपींना लगेच अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोपींना या निकालाविरोधात गिलगिट बाल्टिस्तानमधील उच्च न्यायालयात अपील करता येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
(वृत्तसंस्था)
चारही आरोपी देशाबाहेर
4हे चारही आरोपी देशाबाहेर असल्याचे वृत्त आहे. रेहमान अरब अमिरातीत राहत असून दहशतवादी संघटनांच्या धमक्यामुळे इतरही आरोपी देशाबाहेर गेले आहेत. त्यामुळे त्यांना कधी अटक होईल हे सांगता येणार नाही.
4हे प्रकरण प्रसिद्ध झाल्यानंतर वहिदी व जिओ समूहाने लगेचच माफी मागितली होती. पण दहशतवाद्यांनी ती मान्य करण्यास नकार दिला. या आरोपीविरोधात कराची, इस्लामाबाद येथील न्यायालयातही ईशनिंदेचे खटले दाखल करण्यात आले आहेत.