शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

इलॉन मस्क यांचे एक्स जागतिक स्तरावर ठप्प; महिनाभरात दुसऱ्यांदा तांत्रिक बिघाडामुळे सेवा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 20:33 IST

इलॉन मस्क यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वी ट्विटर) जगभरात बंद आहे.

X Down: सोशल मीडिया क्षेत्रातील दिग्गज प्लॅटफॉर्म आणि इलॉन मस्क यांची मालकी असलेल्या एक्सला (पूर्वीचे ट्विटर) आज पुन्हा एकदा मोठ्या तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला. सोमवारी संध्याकाळी ७:१० च्या सुमारास अचानक एक्सची सेवा जगभरात विस्कळीत झाली. यामुळे भारत, अमेरिका, ब्रिटन आणि युरोपसह अनेक देशांतील लाखो युजर्सना हे अ‍ॅप आणि वेबसाइट वापरण्यात अडचणी येत आहेत.

नेमकी समस्या काय?

डाऊनडिटेक्टर या आउटेज ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, अवघ्या काही मिनिटांत ४५,००० हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या. मोबाईल अ‍ॅप उघडल्यावर कोणतीही पोस्ट दिसत नसून फक्त पांढरी किंवा काळी स्क्रीन दिसत असल्याची तक्रार युजर्सनी केली. तर फीड रिफ्रेश करण्याचा प्रयत्न केल्यास Something went wrong असा मेसेज येत आहे. युजर्सना नवीन पोस्ट करता येत नाहीयेत, तसेच जुन्या पोस्टही आपोआप गायब होत आहेत. मस्क यांच्या कंपनीचा चॅटबॉट ग्रोक देखील या आउटेजमुळे पूर्णपणे ठप झाला आहे.

महिनाभरात दुसऱ्यांदा मोठा फटका

२०२६ मधील ही एक्स डाऊन होण्याची दुसरी मोठी घटना आहे. यापूर्वी १६ जानेवारी २०२६ रोजी देखील भारत आणि अमेरिकेसह अनेक देशांत ७५ हजार युजर्सनी सेवा विस्कळीत झाल्याची तक्रार केली होती. वारंवार होणाऱ्या या तांत्रिक बिघाडामुळे प्लॅटफॉर्मच्या स्थिरतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

एक्सकडून अद्याप मौन

या आउटेजवर इलॉन मस्क किंवा एक्सच्या सपोर्ट टीमकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. सेवा कधीपर्यंत पूर्ववत होईल, याबाबत युजर्समध्ये संभ्रम आहे. दरम्यान, एक्सडाऊन झाल्यामुळे युजर्सनी फेसबुक, इंस्टाग्राम आणि थ्रेड्स सारख्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला प्रतिक्रिया दिल्या.

दरम्यान, ऑक्टोबर २०२२ मध्ये इलॉन मस्क यांनी ४४ बिलियन डॉलर्समध्ये ट्विटर खरेदी केल्यापासून कंपनीत मोठे फेरबदल झाले आहेत. पराग अग्रवाल यांच्यासह टॉप मॅनेजमेंटला हटवणे आणि मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करणे, या निर्णयांचा परिणाम प्लॅटफॉर्मच्या तांत्रिक क्षमतेवर होत असल्याची चर्चा आता पुन्हा एकदा रंगू लागली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Elon Musk's X Faces Global Outage, Second Time This Month

Web Summary : X (formerly Twitter) experienced a major global outage, disrupting service for millions. Users reported issues with feeds and posting. This is the second such incident this month, raising concerns about platform stability. No official statement has been released yet.
टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कSocial Mediaसोशल मीडिया