शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वात विषारी ऑक्‍टोपसनं मह‍िलेला दोन वेळा घेतला चावा, मग जे घडलं ते पाहून सायंटिस्‍टही अवाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 15:24 IST

एक थेंब विषात एका मिनिटांत 26 लोकांना मारण्याची क्षमता...; सायनाईडपेक्षाही 1000 पट घातक

ऑस्ट्रेलियामध्ये एका विषारी ब्ल्यू-रिंग्ड ऑक्टोपसने (Blue-ringed Octopus) एका महिलेस तब्बल दोन वेळा चावा घेतला. या ऑक्टोपसचा जगातील सर्वात विषारी प्राण्यामध्ये समावेश केला जातो. मात्र या विषारी ऑक्टोपसने चावा घेऊनही या महिलेवर कोणताही परिणाम झाला नाही आणि ती जिवंत राहिली.

NSW एम्ब्युलन्सच्या रिपोर्टनुसार, 16 मार्च रोजी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्समधील समुद्रकिनाऱ्यावर पोहत असताना एका महिलेला कवच सापडले. या कवचामध्ये एक निळ्या रंगाचा ऑक्टोपस होता. या ऑक्टोपसने महिलेच्या पोटावर दोन वेळा चावा घेतला. यामुळे महिलेच्या पोटात वेदना सुरू झाल्या. यानंतर पॅरामेडिक्सच्या टीमने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले.

एक थेंब अन् एका मिनिटात 26 लोकांचा मृत्यू - पॅरामेडिक्सच्या पथकाने संबंधित महिलेला रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवले. ज्या ठिकाणी ऑक्टोपसने महिलेला चावा घेतला होता ती जागा थंड पाण्याने शेकण्यात आली. यावर ख्रिश्चन होम्स यांनी फेसबुकवर म्हटले आहे, आमच्यासाठी निळ्या-रिंग्ड ऑक्टोपसच्या चाव्याशी संबंधित बातमी दुर्मिळ आहेत, कारण ते अत्यंत विषारी आहेत. त्यांचे विष सायनाईडपेक्षाही 1000 पट अधिक घातक असते. त्याच्या विषाच्या एका थेंबत, एका मिनिटात 26 लोकांना मारण्याची क्षमता आहे. निळा-रिंग्ड ऑक्टोपस केवळ 12 ते 20 सेमी (5 ते 8 इंच) एवढा लांब असतो.

छोटे ब्लू-रिंग्ड ऑक्टोपस एवढे आक्रमक नसतात - ब्लू-रिंग्ड ऑक्टोपस चावल्यानंतर, शरिरात एक शक्तिशाली न्यूरोटॉक्सिन तयार होते. ते न्यूरॉन सिग्नल एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाण्यापासून रोखते. यामुळे स्नायू सुन्न होतात. यामुळे संबंधित व्यक्तीला दिसण्यास समस्या निर्माण होते. याशिवाय श्वास घेण्यासही समस्या निर्माण होते. मात्र छोटे सेफलोपोड्स ब्लू-रिंग्ड ऑक्टोपस एवढे आक्रामक नसतात. ते केवळ स्वतःचा बचाव करण्यासाठीच चावतात.

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर