जगातील सुंदर महिला ठरलेल्या जेनिफर अॅनिस्टनचा दोन वर्षात मोडला संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 02:37 PM2018-02-16T14:37:52+5:302018-02-16T14:43:44+5:30

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टन आणि जस्टिन थेरॉक्सने लग्नानंतर अवघ्या दोन वर्षात विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

The world's most beautiful woman, Jennifer Aniston marriage broke in two years | जगातील सुंदर महिला ठरलेल्या जेनिफर अॅनिस्टनचा दोन वर्षात मोडला संसार

जगातील सुंदर महिला ठरलेल्या जेनिफर अॅनिस्टनचा दोन वर्षात मोडला संसार

googlenewsNext
ठळक मुद्देअॅनिस्टन 49 तर थेरॉक्स 56 वर्षांचा आहे. 2011 पासून दोघांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली होती. पती-पत्नीचे नाते संपले असले तरी मैत्रीचे नाते दोघांमध्ये कायम राहिलं असे निवेदनात म्हटले आहे. 

वॉशिंग्टन - हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टन आणि जस्टिन थेरॉक्सने लग्नानंतर अवघ्या दोन वर्षात विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ष 2017 च्या अखेरीस आम्ही वैवाहिक नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला असे त्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. आम्ही परस्पर सहमतीने आणि विचारपूर्व हा निर्णय घेतल्याचे दोघांनी म्हटले आहे. पती-पत्नीचे नाते संपले असले तरी मैत्रीचे नाते दोघांमध्ये कायम राहिलं असे निवेदनात म्हटले आहे. 

दोघांच्या नात्याबद्दल माध्यमांमध्ये बरीच उलट-सुलट चर्चा सुरु होती. त्यामुळे त्यांनी अधिकृतपणे निवेदन जारी करुन माहिती दिली आहे. अॅनिस्टन 49 तर थेरॉक्स 56 वर्षांचा आहे. 2011 पासून दोघांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली होती. ऑगस्ट 2015 मध्ये त्यांनी लग्न केले. अॅनिस्टनचा प्रसिद्धीप्रमुख स्टीफ्न ह्युवानेकडून हे निवेदन जारी करण्यात आले. 

आम्ही दोघे परस्परांचे चांगले मित्र असून आमच्यातील ही मैत्री पुढेही कायम राहिलं असे दोघांनी म्हटले आहे. वँडरलस्ट चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान दोघांच्या प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली होती. 2012 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. जेनिफरचा याआधी अभिनेता ब्रॅड पीटबरोबर विवाह झाला होता. पाच वर्षाच्या विवाहानंतर त्यांनी 2005 साली घटस्फोट घेतला. ब्रॅड पीटने नंतर अभिनेत्री अँजलिना जोली बरोबर लग्न केले. दोघांचे प्रेम प्रकरण जगभरात गाजले. पण त्यांचाही घटस्फोट झाला. 
 

जेनिफर अॅनिस्टन जगातील सर्वात सुंदर महिला
दोन वर्षांपूर्वी पीपल मॅगझिनने २०१६ मधील सर्वात सुंदर महिला म्हणून हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टनची निवड केली होती. पीपलच्या कव्हरपेजवर ४७ वर्षीय जेनिफरचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. ही बातमी समजल्यानंतर आपल्याला अत्यानंद झाला. या क्षणाला किशोरवयीन तरुणीसारख्या माझ्या भावना आहेत असे जेनिफरने म्हटले होते.

अमेरिकन टेलिव्हीजनवरील 'फ्रेंडस' या शो मधील राचेल हे तिचे पात्र गाजले. या शो मधील भूमिकेमुळे जेनिफरला नाव, प्रसिद्धी मिळाली. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच जाडेपणा काम मिळण्यामध्ये आडवा येत असल्याचे एजंटने सांगितले. त्यानंतर मी स्वत:वर मेहनत घेतली असे तिने सांगितले.    
 

Web Title: The world's most beautiful woman, Jennifer Aniston marriage broke in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.