शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

रोबोटने कामे करणारी जगातील पहिली इमारत तयार; १७८४ असे अनोखे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 12:15 IST

साऱ्या जगाला आहे या आविष्काराचे कौतुक

सेऊल : दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे एका इमारतीत बरीच कामे रोबोटच्या साहाय्याने केली जातात. ही जगातील पहिली रोबोट फ्रेंडली इमारत असून ती दक्षिण कोरियातील नेव्हर या तंत्रज्ञानविषयक कंपनीने बांधली आहे. यंदा जूनमध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या या इमारतीस ‘१७८४’ असे वैशिष्ट्यपूर्ण नाव देण्यात आले आहे. या अनोख्या वास्तूचे साऱ्या जगात कौतुक होत आहे.

सौदी अरेबियामध्ये निओम सिटी उभारली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाच्या शिष्टमंडळाने नेव्हर कंपनीच्या रोबोट फ्रेंडली इमारतीला भेट देऊन तेथील सुविधांची नुकतीच पाहणी केली. अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथील तज्ज्ञांनीही ही इमारत पाहिली.

१०० रोबोट, हजारो कर्मचारी कार्यरतदक्षिण कोरियाच्या नेव्हर या कंपनीने बांधलेल्या ‘१७८४’ या इमारतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ५ जी तंत्रज्ञान, क्लाऊड, सेल्फ ड्रायव्हिंग सर्व्हिस, रोबोट तंत्रज्ञान अशा अनेक सुविधा आहेत. तिथे १०० रोबोट व हजारो कर्मचारी कार्यरत आहेत. नेव्हर ही कंपनी दक्षिण कोरियातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनचे संचालन करते. त्या सर्च इंजिनला कोरियाचे गुगल असेही म्हटले जाते. कोरोनासारख्या साथींमध्ये विषाणूंचा प्रसार झपाट्याने होतो. तो रोखण्याच्या दृष्टीने विचार करून त्याप्रमाणे या इमारतीतील प्रत्येक मजल्यावर हिटिंग, व्हेंटिलेशन, एअर कंडिशनिंग आदी यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. 

तुम्हाला रोबोट कशी मदत करेल?या इमारतीत सेल्फ ड्रायव्हिंग रोबोट ‘रुकी’ हा महत्त्वाचे आकर्षण आहे. तीन फूट उंचीचा हा रोबोट दिसायला वॉटर डिस्पेन्सरसारखा आहे. अशा प्रकारचे सुमारे १०० रोबोट कर्मचाऱ्यांसाठी भोजन, अन्य खाद्यपदार्थ, पार्सल, कागदपत्रांची डिलिव्हरी अशी कामे करतात. या रोबोटचे डोळे ॲनिमेटेड आहेत. ५ जी व आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने रोबोटच्या हालचाली नियंत्रित होतात.