Lifetime ban on cigarette smoking: सिगारेट विकत घ्यायचीय... आधी ID कार्ड दाखवा, जगात पहिल्यांदाच 'या' देशाने घेतला धाडसी निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 11:04 AM2022-12-15T11:04:00+5:302022-12-15T11:05:25+5:30

तरूणांमध्ये धुम्रपानाचे वाढते प्रमाण हा सध्या जगभरात चिंतेचा विषय आहे

World's First Ban on Smoking imposed by New Zealand for Next Generation ID cards required for buying above certain age | Lifetime ban on cigarette smoking: सिगारेट विकत घ्यायचीय... आधी ID कार्ड दाखवा, जगात पहिल्यांदाच 'या' देशाने घेतला धाडसी निर्णय

Lifetime ban on cigarette smoking: सिगारेट विकत घ्यायचीय... आधी ID कार्ड दाखवा, जगात पहिल्यांदाच 'या' देशाने घेतला धाडसी निर्णय

googlenewsNext

Lifetime ban on cigarette smoking: जगात पहिल्यांदाच एखाद्या देशाच्या सरकारने धुम्रपानाच्या विरोधात अतिशय कडक कायदा लागू केला आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न (Jacinda Ardern) यांच्या सरकारने तरूण पिढीने सिगारेट खरेदी करणाऱ्या आजीवन बंदी घालून तंबाखूसेवन व धूम्रपानावर नियंत्रण मिळण्यासाठी कठोर कायदा केला आहे. तसेच, सिगारेटची खरेदी करताना त्या व्यक्तीला वयाचा पुरावा द्यावा लागणार आहे. नक्की काय आहेत याबद्दलचे नियम, (New Zealand Tobacco Free Bill) जाणून घेऊया.

नवीन कायदा काय?

तंबाखूमुक्त देश होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या न्यूझीलंडने तंबाखूसेवन व धुम्रपानाविरोधात कंबर कसली आहे. योग्य ती तयारी करून हे सरकार त्या दिशेने पावले टाकत आहे. याचे व्यापक परिणाम अपेक्षित आहेत. तात्काळ प्रभावाने, १ जानेवारी २००९ नंतर जन्मलेल्या कोणालाही तंबाखू किंवा सिगारेटची खरेदी करता येणार नाही. लागू केलेल्या कायद्यानुसार तरूणांना सिगारेट खरेदी करण्यावर आजीवन बंदी लादून तंबाखू व धूम्रपानाची समस्या संपवण्याच्या दृष्टीने सर्व बाबी केल्या जात आहेत.

सिगारेटच्या पाकिटांसाठी आयकार्ड लागणार!

सिगारेट खरेदी करण्यासाठी आता प्रत्येक ठिकाणी लोकांना त्यांच्या वयाचा पुरावा दाखवावा लागणार आहे. अहवालानुसार, न्यूझीलंडने २०२५ पर्यंत देशाला धूम्रपानमुक्त करण्याची योजना आखली आहे. स्टॅटिस्टिक्स न्यूझीलंडने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, न्यूझीलंडमधील सुमारे ८% प्रौढ धूम्रपान करतात. अनेक वर्षांनी सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांवर प्रचंड कर लादल्यानंतर ही घट पाहायला मिळाली आहे. नव्या कायद्यानुसार सिगारेट खरेदीचे किमान वय कालांतराने वाढणार आहे. आतापासून ५० वर्षांनी सिगारेटचे पॅकेट विकत घेण्याचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तीला ती व्यक्ती किमान ६३ वर्षांची असल्याचे सिद्ध करण्यासाठी आयडीची आवश्यकता असणार आहे.

आरोग्यमंत्र्यांचे विधान

या कायद्यामुळे देशातील धूम्रपान कमी होईल, अशी आशा देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे येथील तंबाखू विक्रीसाठी परवानगी असलेल्या दुकानदारांची संख्या ६००० वरून ६०० पर्यंत कमी होणार असून धूम्रपान करण्यायोग्य तंबाखूतील निकोटीनचे प्रमाणही कमी होणार आहे. आरोग्य मंत्री डॉ. आयेशा वेराल (Ayesha Verrall) यांच्या म्हणण्यानुसार, 'अशा उत्पादनाची विक्री करण्यास परवानगी देण्याचे कोणतेही योग्य कारण नाही. उलट याच्या सेवनाने लाखो लोकांचा बळी जातो. म्हणूनच आम्ही भविष्यात धुम्रपानाच्या समस्येचे समूळ उच्चाटन करणार आहोत. नवीन आरोग्य व्यवस्थेमुळे कर्करोग, हृदयविकाराचा झटका, पक्षाघात यांसारख्या धूम्रपानामुळे होणाऱ्या आजारांच्या उपचारांसाठी अब्जावधी डॉलर्सची बचत होणार आहे.

Web Title: World's First Ban on Smoking imposed by New Zealand for Next Generation ID cards required for buying above certain age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.