इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्ध आता एका अशा वळणावर आले आहे, जिथे महासत्तेची ताकद पणाला लागली आहे. इराणने दावा केला आहे की, त्यांनी होर्मुज बेटाजवळ शत्रूचे अतिप्रगत 'F-15' लढाऊ विमान पाडले आहे. इराणच्या सरकारी मीडियाने आणि 'प्रेस टीव्ही'ने एक व्हिडिओ जारी केला असून, त्यात आकाशातून एक पेटते विमान खाली पडताना दिसत आहे. इराणच्या एअर डिफेन्स सिस्टमने जमिनीवरून क्षेपणास्त्र डागून हे विमान पाडल्याचे सांगितले जात आहे.
२१ दिवसांत २८ विमाने गायब!
या युद्धात गेल्या २१ दिवसांत अमेरिका आणि इस्रायलला कल्पनेपलीकडे मोठे नुकसान सोसावे लागले आहे. इराणच्या दाव्यानुसार, त्यांनी आतापर्यंत १७ विमाने पाडली किंवा निकामी केली आहेत. एकूण आकडेवारी पाहिली तर दोन्ही देशांची २८ विमाने आणि अनेक महागड्या लष्करी यंत्रणा या युद्धात उद्ध्वस्त झाल्या आहेत.
अमेरिकेचे आर्थिक कंबरडे मोडले!
अमेरिकेला झालेल्या नुकसानीचा आकडा पाहून कोणाचेही डोळे विस्फारतील. अमेरिकेचे १२ रीपर ड्रोन नष्ट झाले आहेत. एका ड्रोनची किंमत सुमारे ५६.५ मिलियन डॉलर आहे. म्हणजेच केवळ ड्रोनमध्येच ५०० मिलियन डॉलरपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. कुवेतमध्ये चुकून झालेल्या गोळीबारात अमेरिकेची ३ 'F-15 स्ट्राइक ईगल' विमाने नष्ट झाली. १२ मार्च रोजी इराकच्या आकाशात एक 'KC-135' फ्युएल टँकर विमान कोसळले, ज्यात ६ जणांचा मृत्यू झाला.
F-35 आणि महागड्या रडारवर हल्ला
१९ मार्च रोजी इराणने अमेरिकेचे सर्वात आधुनिक 'F-35' स्टील्थ फायटर पाडल्याचा दावा केला होता. अमेरिकेने हे विमान पाडल्याचे मान्य केले नसले तरी, त्याला इमर्जन्सी लँडिंग करावे लागल्याचे कबूल केले आहे. याव्यतिरिक्त, अमेरिकेची मिसाईल डिफेन्स सिस्टम असलेल्या 'THAAD' चे रडारही इराणने लक्ष्य केले आहेत. एका रडारची किंमत ३०० ते ५०० मिलियन डॉलर इतकी असते. कतारमधील अल उदीद एअरबेसवर तर १.१ बिलियन डॉलरचे रडार क्षतिग्रस्त झाले आहे.
युद्धखर्चाचा आकडा गगनाला!
हे युद्ध केवळ लष्करीच नाही तर आर्थिकदृष्ट्याही अमेरिकेला महाग पडत आहे. युद्धाच्या पहिल्या ६ दिवसांतच अमेरिकेने ११ ते १२ बिलियन डॉलर खर्च केले आहेत. एका टॉमहॉक क्षेपणास्त्राची किंमत ३.५ मिलियन डॉलर आहे आणि आतापर्यंत ३०० हून अधिक क्षेपणास्त्रे वापरली गेली आहेत. त्यातच अमेरिकेच्या 'USS जेराल्ड आर फोर्ड' या युद्धनौकेला लागलेल्या आगीमुळे काही काळ तिची सेवा विस्कळीत झाली होती.
Web Summary : Iran claims it shot down a US F-15 near Hormuz. Iran says the US and Israel have suffered significant losses in recent weeks, including aircraft and expensive military equipment. The US has faced substantial financial strain, with drone and radar losses totaling billions.
Web Summary : ईरान ने दावा किया कि उसने होर्मुज के पास एक अमेरिकी एफ-15 को मार गिराया। ईरान का कहना है कि अमेरिका और इज़राइल को हाल के हफ्तों में विमानों और महंगे सैन्य उपकरणों सहित भारी नुकसान हुआ है। ड्रोन और रडार के नुकसान से अमेरिका पर भारी वित्तीय दबाव पड़ा है।