या महिला टेनिसपटूवर ट्रम्प झाले होते फिदा

By Admin | Updated: January 22, 2017 14:52 IST2017-01-22T08:06:10+5:302017-01-22T14:52:50+5:30

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रंगेलपणाच्या अनेक सुरस कहाण्या दररोज समोर येत असतात

The women's tennis player was tramped to Fida | या महिला टेनिसपटूवर ट्रम्प झाले होते फिदा

या महिला टेनिसपटूवर ट्रम्प झाले होते फिदा

>ऑनलाइन लोकमत 
वॉशिंग्टन, दि. 22 - अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रंगेलपणाच्या अनेक सुरस कहाण्या दररोज समोर येत असतात. त्यांची प्रेम प्रकरणे, लफडी प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियामध्ये चवीने चर्चिली जातात. आता ट्रम्प एका आघाडीच्या महिला टेनिसपटूवरही लट्टू झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. 
ट्रम्प हे क्रीडा जगतातही चर्चेत राहिले आहेत. सर्बियाची आघाडीची महिला टेनिसपटू अॅना इव्हानोव्हिक हिच्या सौंदर्यावर ट्रम्प मोहित झाले होते. इव्हानोव्हिक ही जगातील सर्वात सुंदर महिला असल्याचे ट्रम्प यांचे मत होते. तीन वर्षांपूर्वी सर्बियाच्या पंतप्रधानांची भेट घेतल्यावरही चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी इव्हानोव्हिकच्या सौंदर्याचा उल्लेख केला होता. इव्हानोव्हिकसारखी सुंदर मुलगी मी आतापर्यंत पाहिली नाही, असे ट्रम्प त्यावेळी म्हणाले होते.  

Web Title: The women's tennis player was tramped to Fida