शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ऐतखाऊ नवरोबांवर महिला ठेवणार नजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2023 08:10 IST

तुम्ही पुरुष आहात की स्त्री? - तुम्ही म्हणाल, हा काय प्रश्न झाला? आणि तुम्ही कशासाठी विचारताहात हा प्रश्न?.. त्याचंही ...

तुम्ही पुरुष आहात की स्त्री? - तुम्ही म्हणाल, हा काय प्रश्न झाला? आणि तुम्ही कशासाठी विचारताहात हा प्रश्न?.. त्याचंही एक महत्त्वाचं कारण आहे; पण समजा तुम्ही पुरुष असाल, तर प्रत्येकानं प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही घरात किती कामं करता? तुमची बायको, आई, बहीण, मुलगी, एकत्र कुटुंबात राहात असाल, तर तुमची वहिनी, काकू... यांच्या तुलनेत घरातील कामाचा तुमचा वाटा किती? 

याबाबतीत खात्रीनं सांगता येईल, घरातील कामांची जबाबदारी मुख्यत्वे असते, ही जबाबदारी स्वत:हून, स्वेच्छेने घेतात त्या महिलाच. या तुलनेत पुरुषांची स्थिती काय आहे? - सन्माननीय अपवाद वगळता, एकतर बहुसंख्य पुरुष घरातली कामं करतच नाहीत. केलीच तर ती दुसऱ्यावर उपकार केल्यासारखी आणि तेही शंभर वेळा बोलून दाखवतील... बघा, मी किती काम केलं! आजकाल अनेक घरात पुरुषाच्या बरोबरीनं स्त्रियाही बाहेर नोकरी करतात. दोघांनाही कामाचे टेन्शन्स, जबाबदाऱ्या असतातच; पण घरी आल्यावर महिला पुन्हा कामाला जुंपतात, तर पुरुष आराम फर्मावतात.

ही गोष्ट काही भारतातच आहे, असं नाही. संपूर्ण जगभरात हीच स्थिती आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला खरोखरच खूप काम करतात. कामाच्या रगाड्याखाली त्या अक्षरश: दबून गेलेल्या असतात, पिचलेल्या असतात; पण त्याचं कोणालाच काही सोयरसुतक नसतं. स्त्री-पुरुष समानता कागदावर अनेक ठिकाणी दिसेल; पण तशी परिस्थिती अपवादानंही कुठे नसेल, अशीच स्थिती आहे. 

स्पेन सरकारनं मात्र आता या वस्तुस्थितीची सरकारी पातळीवर दखल घेतली आहे आणि त्यादृष्टीनं प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. याचाच पहिला भाग म्हणून स्पेननं एक खास प्रकारचं ॲप तयार करायला सुरुवात केली आहे. या ॲपच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक घरात प्रत्येक पुरुष आणि प्रत्येक स्त्री किती काम करते याची नोंद केली जाईल, त्याचं मोजमाप होईल. त्यानंतर या डाटाचा उपयोग करून स्पेन सरकार आपल्या ध्येयधोरणांमध्ये आणखी काही मूलभूत बदल करणार आहे. या ॲपच्या माध्यमातून पुरुषांना घरात कामं करण्यासाठी प्रोत्साहित तर केलं जाईलच, शिवाय त्यांच्या घरकामाचे तासही मोजले जातील. या ॲपचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ॲपच्या माध्यमातून आपला पती घरात किती काम करतो, यावर महिलांना नजरही ठेवता येईल. मुख्य म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला हातातल्या हातात हव्यात, एवढंसं काम करायला काय लागतं, असं म्हणणाऱ्या पुरुषांना त्या कामाची किंमत कळेल आणि त्यासाठी किती वेळ लागतो, काय काय करावं लागतं याचीही जाणीव होईल. घरगुती कामातील महिला आणि पुरुषांमधील असमतोल दूर करण्याच्या हेतूनं सरकारनं हे पाऊल उचललं आहे. जगभरातला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे.

स्पेनच्या लैंगिक समानता आणि घरगुती हिंसाचारविरोधी एंजेला रॉड्रिग्ज यांच्या मते जगात कुठेही जा, सगळ्या कामांची जबाबदारी महिलांवरच, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी एकट्यानंच जीव काढायचा, नवरोबांनी मात्र ऐटीत बसून हुकूम सोडायचे.. असं कसं चालणार? पुरुषांनीही घरच्या जबाबदारीतला आपला वाटा उचलायलाच हवा. त्यांना त्यादृष्टीनं सक्षम करण्यासाठीच आम्ही काही पावलं उचलत आहोत.. महिलांच्या संदर्भात सर्वच, विशेषत: घरगुती पातळीवर केल्या जात असलेल्या भेदभावाविरोधात काय उपाययोजना केल्या जातील, यासंदर्भात संयुक्त राष्ट्र समितीची एक बैठक नुकतीच जिनिव्हा येथे झाली. त्यावेळी स्पेननं यासंदर्भात आम्ही एक खास ॲप तयार करीत असल्याची घोषणा केली. 

एंजेला रॉड्रिग्ज म्हणतात, जवळपास प्रत्येक घरात कामाचं वाटप इतकं असमान पद्धतीनं केलेलं असतं की सगळा भार एकट्या स्त्रीवरच येतो. स्त्रिया करीत असलेली अनेक कामं तर अशी असतात, जी बऱ्याचदा ‘दाखवता’ही येत नाहीत; पण ही कामं जर केली नाहीत, तर कोणतंही घर सुरळीतपणे चालू शकणार नाही.

महिला म्हणतात, शेवटी मरण आमचंच! साधं घर झाडायचं किंवा स्वच्छ ठेवण्याची गोष्ट घ्या, समजा घर झाडायला वीस मिनिटं लागत असतील, दिवसातून दोनदा घर आवरावं, साफ करावं लागत असेल, तर त्यात त्या महिलेचा किती वेळ गेला? - अशी पाच-पाच, दहा-दहा मिनिटांची अनेक कामं त्या महिलेचा अख्खा दिवस खाऊन टाकतात. शिवाय या अदृष्य प्रेशरमुळे तिच्या शरीर-मनाची खिचडी होते ती वेगळीच! स्पेनमध्ये नुकतंच एक व्यापक सर्वेक्षण करण्यात आलं. त्यातही हजारो महिलांनी सांगितलं, आमचा नवरा, घरातले पुरुष ‘ऐतखाऊ’ आहेत! साधी इकडची काडीही ते तिकडे करीत नाहीत! मग शेवटी मरण आमचंच!

टॅग्स :Womenमहिला