शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
4
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
5
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
6
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
7
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
8
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
9
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
10
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
11
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
12
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
13
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
14
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
15
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
16
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
17
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
18
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
19
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
20
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलाला घरी बोलवून ठेवले त्याच्यासोबत संबंध, आजी हॉस्पिटलमध्ये असताना घेतला फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 17:38 IST

UK : शिक्षिकेने आधी त्याला गोड बोलण्यात फसवलं आणि मग त्याला आपल्या घरी बोलवलं. तिथे त्याच्यासोबत संबंध ठेवले.

ब्रिटनच्या (UK) यॉर्कशायरमधून महिलेचा एक असा कारनामा समोर आला आहे, ज्याबाबत वाचून सगळेच हैराण झाले आहेत. इथे एका शिक्षिकेने तिच्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण केलं. शिक्षिकेने आधी त्याला गोड बोलण्यात फसवलं आणि मग त्याला आपल्या घरी बोलवलं. तिथे त्याच्यासोबत संबंध ठेवले. आता कोर्टाने महिलेला या गुन्ह्यासाठी ३ वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 

सोशल मीडियावर झाली होती मैत्री

'द सन' च्या रिपोर्टनुसार, महिला सर्वातआधी जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून या विद्यार्थ्याला भेटली तेव्हा तिचं  वय २९ वर्षे होतं. यानंतर महिलेने विद्यार्थ्यासोबत जवळीक वाढवली आणि मग त्याला आपल्या घरी बोलवलं. महिलेने मुलासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचं मान्य केलं. सोबतच तिने तिचा गुन्हाही मान्य केला आहे.

पीडित मुलाने आपल्या जबाबात कोर्टात सांगितलं की, महिलेचं वय आता ३२ वर्षे आहे. पण तिने आधीच माझा फायदा उचलला आणि माझ्यासोबत तिने हे सगळं तेव्हा केलं जेव्हा माझी आजी हॉस्पिटलमध्ये गंभीर स्थितीत होती. वकिलाने कोर्टाला सांगितलं की, दोघेही सोशल मीडियावर भेटले होते. त्यावेळी महिलेने तिचं वय २९ तर मुलाने १७ वर्षे लिहिलं होतं.

महिलेने त्याला घरी बोलवलं आणि....

सुनावणी दरम्यान कोर्टात वकिल रॉबिनसन यांनी सांगितलं की, महिलेने पीडित मुलाला किस केलं आणि मग वरच्या रूममध्ये नेऊन त्याच्यासोबत संबंध ठेवले. भेटीदरम्यान पीडितने महिलेला सांगितलं की, तो आता केवळ १५ वर्षांचा आहे. पण महिलेने काही ऐकलं नाही आणि त्याला आपली शिकार बनवलं. दोघांच्या मेसेजच्या माध्यमातून झालेल्या चॅटमधून समजलं की, पीडित महिलेला म्हणाला होता की, तो तिच्यावर प्रेम करतो. दोघे मेसेजच्या माध्यमातून सेक्स आणि पॉर्न कटेंटशी संबंधित गप्पा मारत होते.

पीडित कोर्टात दिलेल्या जबाबात सांगितलं की, जे काही झालं ते फार वाईट झालं. कारण महिला त्याच्यापेक्षा बरीच मोठी आहे. पण कदाचित तिने मला तिच्या जाळ्यात फसवलं होतं. तो म्हणाला की, १५ वय असल्याने इतरांप्रमाणे माझ्या मनातही या गोष्टीबाबत फार उत्सुकता होती. त्यावेळी माझ्या आजीची तब्येत बरी नव्हती. हे तिलाही माहीत होतं. मला वाटतं या महिलेने माझा गैरफायदा घेतला.

टॅग्स :LondonलंडनCrime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषण