कामाच्या ठिकाणी महिलाच महिलांना साथ देत नाहीत - इंद्रा नुयी

By Admin | Updated: April 15, 2016 10:41 IST2016-04-15T10:41:02+5:302016-04-15T10:41:02+5:30

सहकारी महिलेने चांगले काम केले तर स्तुती सुद्धा करत नाही असे विधान प्रसिद्ध पेप्सिको कंपनीच्या सीईओ इंद्रा नुयी यांनी केले.

Women do not support women at work place - Indra Nooyi | कामाच्या ठिकाणी महिलाच महिलांना साथ देत नाहीत - इंद्रा नुयी

कामाच्या ठिकाणी महिलाच महिलांना साथ देत नाहीत - इंद्रा नुयी

ऑनलाइन लोकमत 

न्यूयॉर्क, दि. १५ - महिलाच महिलांना कामाच्या ठिकाणी मदत करत नाहीत तसेच सहकारी महिलेने चांगले काम केले तर स्तुती सुद्धा करत नाही असे विधान प्रसिद्ध पेप्सिको कंपनीच्या सीईओ इंद्रा नुयी यांनी केले. न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कामाच्या ठिकाणी महिलाच महिलांना पुरेशी साथ देत नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. 
 
महिलांना कामाच्या ठिकाणी भेडसावणा-या समस्यांच्या विषयांवर त्या बोलत होत्या. प्रत्येकवेळी आपल्यालाही कामाच्या ठिकाणी चांगला अनुभव आला नसल्याचे त्यांनी सांगितले. हनी, स्वीटी, बेब हे शब्द कानावर पडल्यानंतर आपल्याला संताप येतो असे नुयी यांनी सांगितले. 
 
महिला क्रांती पूर्ण करण्यासाठी समाज, सरकार, कंपनी, कुटुंब आपल्यापरीने कसे योगदान देणार याविषयी आपण कधीच बोलत नाही. आता महिलांनी महिलांना मदत करण्याची वेळ आहे असे नुयी यांनी सांगितले. 
 

Web Title: Women do not support women at work place - Indra Nooyi