मुलीला सौंदर्यासाठी खाऊ घातले जंत

By Admin | Updated: August 24, 2014 02:17 IST2014-08-24T02:17:26+5:302014-08-24T02:17:26+5:30

अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात एक आई आपल्या मुलीला सुंदर बनविण्यासाठी जंत खाऊ घालत होती. या अघोरी कृत्याचा व्हायचा तोच परिणाम झाला.

Woman worn for beauty | मुलीला सौंदर्यासाठी खाऊ घातले जंत

मुलीला सौंदर्यासाठी खाऊ घातले जंत

फ्लोरिडा : अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात एक आई आपल्या मुलीला सुंदर बनविण्यासाठी जंत खाऊ घालत होती. या अघोरी कृत्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. मुलीला भयंकर पोटदुखी सुरू झाली. वेदना असहय़ झाल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा ही बाब समोर आली. 
वैद्यकीय तपासणीत या मुलीच्या पोटात लांब जंत आढळून आले. मुलीला सौंदर्य स्पर्धेत प्रवेश मिळावा म्हणून आई तिचे वजन कमी करू इच्छित होती. या अल्पवयीन मुलीला जेव्हा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांना सुरुवातीला ही मुलगी गर्भवती असेल, असे वाटले होते. मात्र, तसे काहीही आढळले नाही. 
तपासणीत मुलीच्या आतडय़ांवर सूज असल्याचे आढळून आले. परिचारिकेने या मुलीच्या प्रात:विधीचे निरीक्षण केले तेव्हा आजाराचे कारण समोर आले. ही मुलगी स्वच्छतागृहात जाऊन आल्यानंतर संपूर्ण स्वच्छतागृह लांब जंतांनी भरून गेले होते. मुलीची आई मेक्सिकोतून लांब जंतांचे अंडे आणून बळजबरीने मुलीला खाऊ घालत होती. लांब जंतांमुळे वजन कमी होते, असे मानले जाते. वजन कमी होऊन मुलीला सौंदर्य स्पर्धेत प्रवेश मिळावा, असे या आईला वाटत होते.  (वृत्तसंस्था)
 
 

 

Web Title: Woman worn for beauty