सिरियन निर्वासिताकडून जर्मनीत महिलेची हत्या

By Admin | Updated: July 24, 2016 23:44 IST2016-07-24T23:41:48+5:302016-07-24T23:44:52+5:30

सिरियन निर्वासिताने मोठ्या सुऱ्याने रविवारी महिलेची हत्या केली, तर इतर दोघांना जखमी. दक्षिण-पश्चिम जर्मनीतील रिऊतलिंगेन शहरात हा हल्ला झाला

A woman from Syrian refugee killed in Germany | सिरियन निर्वासिताकडून जर्मनीत महिलेची हत्या

सिरियन निर्वासिताकडून जर्मनीत महिलेची हत्या

ऑनलाइन लोकमत
बर्लिन, दि. २४  : सिरियन निर्वासिताने मोठ्या सुऱ्याने रविवारी महिलेची हत्या केली, तर इतर दोघांना जखमी. दक्षिण-पश्चिम जर्मनीतील रिऊतलिंगेन शहरात हा हल्ला झाला, असे पोलिसांनी सांगितले. हा हल्ला दहशतवादी होता याचा कोणताही पुरावा नसल्याचेही ते म्हणाले.

हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. या व्यक्तीचा महिलेशी आधी वाद झाला होता, त्यानंतर तिला त्याने सुऱ्याने ठार मारले व त्याआधी दुसऱ्या महिलेला व आणखी एकाला जखमी केले. या हल्ल्याचे कारण पोलिसांनी सांगितलेले नाही.

Web Title: A woman from Syrian refugee killed in Germany

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.