शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

हरवलेली मुलगी सून बनून घरी परतते तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 4:36 AM

चीनमधील घटना : २० वर्षांनंतर आईला दिसली लेक

सुझोऊ (जियांगसू प्रांत, चीन) : स्वत:च्या मुलाची होणारी पत्नी ही आपलीच खूप वर्षांपूर्वी हरवलेली मुलगी आहे, हे आईने ओळखल्यावर तिला आनंदाचे अश्रू आले. हा आनंदाचा धक्का तिला प्रत्यक्ष लग्न समारंभात बसला. ही सुखद घटना ३१ मार्च रोजी सुझोऊमध्ये घडली.मुलाच्या आईला नियोजित सुनेच्या हातावर जन्मखूण दिसली. तिची जी मुलगी हरवली होती तिच्याही हातावर अशीच खूण होती. ती खूण दिसल्यावर मुलाच्या आईने वधूच्या पालकांना विचारले की, तिला तुम्ही २० वर्षांपूर्वी दत्तक घेतलेले आहे का? या प्रश्नाने त्यांचा गोंधळ उडाला कारण ते एक गुपित होते.पालकांनी सांगितले की, “आम्हाला किती तरी वर्षांपूर्वी अगदी छोटी मुलगी रस्त्याच्या कडेला सापडली व तिला आम्ही आमची मुलगी म्हणूनवाढवले.” हा घटनाक्रम ऐकल्यावर मुलगी वधूचे डोळे भरून आले. तिला आपल्या जैविक आई व वडिलांबद्दल आणखी माहिती हवी होती. ती म्हणाली, “माझ्या खऱ्याखुऱ्या आईला भेटतेय हा क्षण लग्नाच्या दिवसापेक्षाही आनंदाचा आहे.” ही कथा येथेच संपत नाही. कारण आणखी काही घडणार होते.दत्तक घेतलेला मुलगाच झाला जावईआपल्या मोठ्या भावाशी कसे लग्न करायचे याची काळजी ती करीत होती. तथापि, सासूने तिला सांगितले की, मुलगाही दत्तक घेतलेला असल्यामुळे या लग्नाला आक्षेप घ्यावे, असे काही नाही. बेपत्ता मुलगी सापडण्याच्या सगळ्या आशा संपुष्टात आल्यावर महिलेने मुलगा दत्तक घेतला होता. तिने मुलीचा अनेक वर्षे शोध घेतला, पण उपयोग झाला नाही, असे ओरिएंटल डेलीने वृत्त दिले. मुलगा आणि मुलगी हे रक्ताचे नातेवाईक नसल्यामुळे त्यांच्या लग्नात काही अडचण नाही, असे ही महिला म्हणाली. वस्तुस्थिती स्पष्ट झाल्यावर त्या जोडप्याने रीतसर लग्न केले व दत्तक घेतलेला मुलगा या प्रसंगामुळे जावयात रूपांतरित झाला.