शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

महिला वटवाघुळाचा सूप प्यायली, Video अपलोड केला; आता होऊ शकते 5 वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 19:21 IST

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलेवर अनेकांनी टीका केली. यानंतर तिने माफीही मागितली.

जगभरात अनेक रोग पसरले आहेत, ज्याचे मूळ वटवाघुळ असल्याचे अनेक शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. कोरोनासारखा विषाणूही याच वटवाघुळातून आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वटवाघुळापासून लोक दूर पळतात. पण, एका महिलेने चक्क वटवाघुळाचा सूप प्यायल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी त्या महिलेला अटक झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला एका महिला शिक्षिका आणि यूट्यूब क्रिएटर आहे. तिने वटवाघळांचा सूप पितानाचा व्हिडिओ अपलोड केला आहे. महिलेला तिच्या या कृत्यासाठी 5 वर्षे तुरुंगवास भोगावा लागू शकतो किंवा 11 लाख रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. मात्र, महिलेने यासाठी माफीदेखील मागितली आहे. अशा कृत्यामुळे पुन्हा साथीचे रोग सुरू होण्याचा धोका असू शकतो, अशी शक्यता अनेक आरोग्य तज्ञांनी व्यक्त केली आहे.

महिलेने माफी मागितली

रिपोर्टनुसार, या महिलेला 9 नोव्हेंबर रोजी थायलंडच्या ईशान्येला असलेल्या साखोन नाखोन प्रांतातून अटक करण्यात आली होती. थायलंडच्या वन्यजीव कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी या महिलेला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी सांगितले की जेव्हा महिलेला अटक करण्यात आली, तेव्हा तिने तिच्यावरील आरोप स्पष्टपणे नाकारले. मात्र, दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये महिलेने माफी मागितली. तिने वचन दिले की, ती यापुढे कधीही वटवाघुळ खाणार नाही.

वटवाघुळ खाण्याचे अनेक धोके चुलालॉन्गकॉर्न युनिव्हर्सिटीच्या मेडिसिन फॅकल्टीमधील प्रोफेसर तिरावत हेमाजुता यांनी सांगितले की, लोकांनी वटवाघुळ खाऊ नये, कारण त्यात अनेक बॅक्टेरिया असतात. यामुळे ते आजारी पडू शकतात आणि महामारीही सुरू होऊ शकते. वटवाघुळ नीट शिजवलेले असले, तरीही लोकांना संसर्ग होण्याचा धोका असतो. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सchinaचीन