शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

माझ्या सरकारने दूरगामी परिवर्तन घडवणारे निर्णय घेतले, दावोसमध्ये जागतिक नेत्यांसमोर मोदींचे हिंदीमध्ये भाषण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 4:52 PM

स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे भरलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज हिंदीमध्ये भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी आज जगासमोर असलेल्या वेगवेगळया आव्हानांचा आढावा घेतला.

ठळक मुद्देआपल्या सरकारने साडेतीनवर्षांच्या कार्यकाळात अनेक महत्वाचे दूरगामी परिवर्तन करणारे निर्णय घेतले आहेतआम्ही कोणा एकाच्या नव्हे सर्वाच्या विकासासाठी काम करत आहोत, सबका साथ, सबका विकास आमचा मंत्र आहे

दावोस - स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे भरलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज हिंदीमध्ये भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी आज जगासमोर असलेल्या वेगवेगळया आव्हानांचा आढावा घेतला. पर्यावरणात होणारे बदल, दहशतवादात गुड आणि बॅड असा फरक करणं तसेच आत्मकेंद्रीत होणा-या जगापासून धोका असल्याचे मोदींनी सांगितले. 1997 साली एचडी देवेगौडा दावोसमध्ये येणारे भारताचे शेवटचे पंतप्रधान होते. त्यावेळी भारताचा जीडीपी 400 अब्ज डॉलर्सच्या आसपास होता. पण आता हाच जीडीपी सहापट जास्त आहे असे मोदींनी सांगितले. 

 

आपल्या सरकारने साडेतीनवर्षांच्या कार्यकाळात अनेक महत्वाचे दूरगामी परिवर्तन करणारे निर्णय घेतले आहेत आणि अशा निर्णयाची प्रकिया सुरु राहील. 30 वर्षानंतर भारतात पूर्ण बहुमताचे सरकार सत्तेवर आले. आम्ही कोणा एकाच्या नव्हे सर्वाच्या विकासासाठी काम करत आहोत. सबका साथ, सबका विकास आमचा मंत्र आहे असे मोदी म्हणाले.  दहशतवादापासून जगाला जितका धोका आहे त्यापेक्षा जास्त धोका दहशतवादामध्ये गुड आणि बॅड फरक करण्यामुळे आहे असे मोदी म्हणाले. 

 

आज आपण स्वत:च्या स्वार्थासाठी निर्सगाला हानी पोहोचवत आहोत. हा विकास आहे का ? हा प्रश्न आपण स्वत:ला विचारला पाहिजे. वातावरण बदलाच आज मानवतेसमोर मोठ आव्हान आहे असे मोदी म्हणाले. आत्मकेंद्रीत होणा-या जगापासूनही धोका आहे. असा आत्मकेंद्रीतपणा जागतिकीकरणाची जी व्याख्या आहे त्याविरोधात जाणारा आहे असे मोदी म्हणाले. जगात अर्थकारण वेगान पुढे जातयं आणि राजकीय बदलही घडतायत. शांतता, स्थिरता आणि सुरक्षेसमोर नवी आणि गंभीर आव्हाने आहेत. भारतीयांचा तोडण्यावर नव्हे जोडण्यावर विश्वास असल्याचे मोदींनी  यावेळी सांगितले.  आजा डेटामुळे अनेक संधी निर्माण होत आहेत.  पण डेटाचा तयार होणारा डोंगर एक आव्हान आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे मत मोदींनी व्यक्त केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीWorld Economic Forum 2018जागतिक आर्थिक फोरम 2018