शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

डॉलरची दादागिरी संपुष्टात येणार? भारत-रशिया-चीनने बनवला प्‍लॅन, अमेरिकेच्या सर्वात मोठ्या ताकदीला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 11:57 IST

ब्रिक्स देशांनी बुधवारी व्यापार वाढविणे आणि त्यासाठी स्थानीक चलनाची व्यवस्था करण्यास सहमती दर्शवली आहे.

रशियातील कझान येथील ब्रिक्स परिषदेत ‘पूर्व विरुद्ध पश्चिम’ या मुद्द्याला अधिक महत्व देण्यात आले. जगातील तीन मोठ्या आर्थिक शक्ती एका व्यासपीठावर आल्याने पाश्चिमेकडील सर्वच देशांचे लक्ष यांच्याकडे लागले होते. या परिषदेत भारत, रशिया आणि चीनने अमेरिकेला व्यापारासंदर्भात थेट आव्हान देण्याचे संकेत दिले आहेत. ब्रिक्समध्ये समाविष्ट असलेल्या देशांनी आपसातील व्यवहार अथवा व्यापर डॉलरऐवजी स्थानिक चलनात करण्यावर जोर दिला आहे. अर्थात भारत या देशांसोबत डॉलरऐवजी रुपयात व्यवहार करू शकणार आहे. सध्या जागतिक व्यापारातील बहुतांश व्यवहार केवळ डॉलरमध्ये होतात.

ब्रिक्स देशांनी बुधवारी व्यापार वाढविणे आणि त्यासाठी स्थानीक चलनाची व्यवस्था करण्यास सहमती दर्शवली आहे. याशिवाय, स्वतंत्रपणे कार्यरत क्रॉस-बॉर्डर सेटलमेंट आणि डिपॉझिटरी इन्फ्रास्ट्रक्चर आणि ब्रिक्स पुनर्विमा कंपनीच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यावरही सहमती दर्शवण्यात आली आहे. तसेच, सदस्य देशांच्या नेत्यांनी 21व्या शतकात नव विकास बँकेला एक नव्या प्रकारची बहुपक्षीय विकास बँक (एमडीबी) म्हणून विकसित करण्यावरही सहमती दर्शवली असून ब्रिक्सच्या नेतृत्वातील बँकेचे सदस्यत्व वाढविण्याचेही समर्थन केले आहे.

असं आहे ब्रिक्‍सचं घोषणा पत्र -16व्या ब्रिक्स शिखर सम्मेलनानंतर, जारी करण्यात आलेल्या घोषणापत्रात म्हणण्यात आले आहे की, सदस्य देश कामाकाजात स्थिरता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी डिजिटल पायाभूत सुविधा क्षेत्रात संयुक्त कामकाची शक्यता शोधतील. BRICS नेत्यांनी 21 व्या शतकातील मानवी जीवनाच्या सर्व पैलूंच्या वेगाने होणाऱ्या डिजिटलायझेशन प्रक्रियेसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. तसेच, विकासासाठी डेटाची महत्त्वपूर्ण भूमिका आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी BRICS मधील प्रतिबद्धता अधिक घट्ट करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

तीन बडे नेते एका व्यासपीठावर -या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासह ब्रिक्स देशांतील प्रमुकांनी भाग घेतला होता. ब्रिक्‍सने म्हटले आहे की, आम्ही व्यापारातील अडथळे कमी करणे आणि भेदभावविरहित प्रवेश करण्याच्या तत्त्वावर तयार, वेगवान, कमी किमतीच्या, कार्यक्षम, पारदर्शक, सुरक्षित आणि सर्वसमावेशक क्रॉस-बॉर्डर पेमेंट उत्पादनांचे सर्वसमावेशक फायदे जाणतो. ब्रिक्स देश आणि त्यांचे व्यापारी भागीदार यांच्यातील आर्थिक व्यवहारांत स्थानिक चलनांच्या वापराचे आम्ही स्वागत करतो. 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनAmericaअमेरिका