वॉशिंग्टन : इराणवरील हल्ले अधिक तीव्र होणार असून, काही तासांनी आजपर्यंतचा सर्वात तीव्र हल्ला इराणवर केला जाईल, असा इशारा अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी मंगळवारी दिला. पेंटॅगॉनमधील पत्रकार परिषदेत हेगसेथ यांनी इराणवरच्या हल्ल्यांमध्ये लढाऊ विमानांची संख्या वाढविली जाणार असून, मोठ्या प्रमाणात बॉम्बवर्षाव केला जाणार असल्याचे सांगितले. हेगसेथ यांनी या युद्धापासून रशियाने स्वतःला दूर ठेवावे, असेही वक्तव्य केले.
सोमवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध सुरू असलेले युद्ध अल्पकालीन ठरू शकते, असे संकेत दिले. मात्र, इराणने आंतरराष्ट्रीय तेलपुरवठा रोखण्याचा प्रयत्न केल्यास लष्करी कारवाई अधिक तीव्र केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता.
इराणमध्ये अमेरिका-इस्रायलचे ३० हेर : अमेरिका आणि इस्रायलसाठी हेरगिरी व सहकार्य केल्याच्या संशयावरून इराणच्या गुप्तचर मंत्रालयाने अलीकडील काही दिवसांत ३० जणांना अटक केल्याची माहिती दिली आहे.
मोज्तबांचा ठिकाणा कुठे?
इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांच्याकडे सोमवारी सत्तेची सूत्रे आली असली तरी त्यांनी अद्याप राष्ट्रीय दूरचित्रवाणीवरून देशाला संबोधलेले नाही किंवा सार्वजनिक कार्यक्रमांत ते उपस्थित दिसले नाहीत.
Web Summary : The US Defense Secretary warned of an intensified bombing campaign against Iran. Increased airstrikes are planned. Russia has been advised to stay away from the conflict. Iran detained thirty people suspected of spying for the US and Israel.
Web Summary : अमेरिकी रक्षा मंत्री ने ईरान पर भीषण बमबारी की चेतावनी दी है। हवाई हमले बढ़ेंगे। रूस को संघर्ष से दूर रहने की सलाह दी गई है। ईरान ने अमेरिका और इजरायल के लिए जासूसी करने के संदेह में तीस लोगों को हिरासत में लिया।