शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

इलॉन मस्क होतील अमेरिकेचे पुढचे राष्ट्रपती? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 15:57 IST

अमेरिकेतील नव्या सरकारची खरी ताकद इलॉन मस्क यांच्या हातात असेल, असे म्हटले जात आहे. यावर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यापासून डोनाल्ड ट्रम्प सातत्याने चर्चेत आहेत. अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेण्यापूर्वीच त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांचीही निवड केली आहे. महत्वाचे म्हणजे, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे सर्वात मोठे समर्थक इलॉन मस्क यांचाही त्यांच्या मंत्रिमंडळात समावेश असणार असल्याचे बोलले जात आहे. असे झाल्यास, अमेरिकेतील नव्या सरकारची खरी ताकद इलॉन मस्क यांच्या हातात असेल, असे म्हटले जात आहे. यावर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

इलॉन मस्क “होतकरू आणि मेहनती” -ॲरिझोना येथे एका उत्सवादरम्यान ट्रम्प म्हणाले, “इलॉन मस्क एक अतिशय होतकरू आणि मेहनती व्यक्ती आहे”. मात्र, अमेरिकेच्या नव्या सरकारमध्ये त्यांच्याकडे खरी पॉवर नसेल. याच बरोबर, पुढील निवडणुकीत मस्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याच्या शक्यतेसंदर्भात बोलताना ट्रम्प म्हणाले, "मस्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही होणार नाहीत. कारण, मस्क यांचा जन्म अमेरिकेत झालेला नसल्याने, त्यांना राष्ट्राध्यक्ष होण्याचा घटनात्मक अधिकार नाही."

डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, "मला स्मार्ट लोक आवडतात. इलॉन मस्क यांनी उत्कृष्ट काम केले आहे. मला अशा स्मार्ट आणि विश्वासार्ह लोकांची आवश्यकता आहे. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी या देशात जन्म होणे आवश्यक आहे."

डेमोक्रॅट्सच्या टीकेला ट्रम्प यांचं उत्तर -डोनाल्ड ट्रम्प यांचे हे विधान डेमोक्रॅट्सच्या टीकेनंतर आले आहे.  'अमेरिकेच्या नव्या सरकारमध्ये इलॉन मस्क यांची बूमिका ट्रम्प यांच्या पेक्षाही मोठी असेल,' अशी टीका डेमोक्रॅट्सनी केली होती. यावर ट्रम्प म्हणाले, "ही डेमोक्रॅट्सची खेळी आहे. त्यांना हा संदेश द्यायचा आहे की, मस्क यांच्याकडेच नव्या सरकारची खरी पॉवर असेल. मात्र, मस्क राष्ट्रपती होत नाहीयत, मी सुरक्षित आहे."

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पelon muskएलन रीव्ह मस्कAmericaअमेरिकाUSअमेरिका