बीजिंग : आजन्म चीनचे सर्वोच्च नेते राहणार, असे ज्यांचे वर्णन केले जाते ते चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पक्षातील संबंधितांना अधिकार सोपवण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या १२ वर्षांपेक्षा अधिकच्या कारकिर्दीत हे प्रथमच घडत आहे.
या निर्णयामुळे ते कदाचित सत्ता संक्रमणाचा पाया घालत आहेत किंवा संभाव्य निवृत्तीच्या तयारीसाठी पार्श्वभूमी तयार करीत आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे.
दूध उत्पादकांना दि.३० पर्यंत पैसे: सहकारमंत्री सुभाष शिरोडकर
सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीनच्या पॉलिटिकल ब्यूरोच्या ३० जून रोजीच्या बैठकीत व्यापक आढावा घेण्यात आला. त्यानंतर जिनपिंग यांच्या सत्ता संक्रमणाबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत पक्षाच्या केंद्रीय समितीच्या निर्णय घेण्याच्या, विचारमंथनाच्या आणि समन्वय साधणाऱ्या संस्थांच्या जबाबदाऱ्या वाढवण्यावर चर्चा झाली. अशा संस्थांनी प्रभावी नेतृत्व व समन्वय साधावा व प्रमुख कामांचे नियोजन, देखरेख करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असेही निश्चित झाल्याचे समजते. या सर्व बाबी म्हणजे जिनपिंग यांच्या निवृत्तीचे संकेत देत आहेत, असे नाव न छापण्याच्या अटीवर एका राजकीय विश्लेषकाने सांगितले.