वाघासंगे खेळ रंगे...
By Admin | Updated: February 13, 2015 00:58 IST2015-02-13T00:58:08+5:302015-02-13T00:58:08+5:30
थायलंडच्या कांचनपुरी प्रांतातील साईयांग जिल्ह्यातील टायगर टेम्पलमध्ये (वाघ मंदिर) बौद्ध भिक्खू गुरुवारी वाघांसोबत खेळताना.

वाघासंगे खेळ रंगे...
थायलंडच्या कांचनपुरी प्रांतातील साईयांग जिल्ह्यातील टायगर टेम्पलमध्ये (वाघ मंदिर) बौद्ध भिक्खू गुरुवारी वाघांसोबत खेळताना. या मंदिरात सुुमारे १०० पट्टेदार वाघ असून एकाही वाघाला क्रूरतापूर्ण वागणूक देण्यात येत असल्याचे आढळले नाही, असे वन्यजीव संरक्षण अधिकाऱ्यांनी जाहीर केले. वाघांनी शांत राहावे म्हणून त्यांना अमली पदार्थांचे इंजेक्शन दिले जात असल्याचा आरोप केला जातो. बौद्ध भिक्खू आणि या प्राण्यांची देखभाल करणाऱ्या पशुवैद्यकांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. वाघ बौद्ध भिक्खूंसोबत पाळीव प्राण्यांप्रमाणे राहत असल्याचे पाहण्यासाठी येथे देशोदेशीचे पर्यटक येतात. वाघ मंदिर हे विदेशी पर्यटकांसाठी थायलंडमधील सर्वांत लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.