पत्नीला 'त्याच्या'सोबत पाहून पेंग्विन भडकला!

By Admin | Updated: November 6, 2016 15:31 IST2016-11-06T15:01:01+5:302016-11-06T15:31:49+5:30

आपल्या मादीला दुसऱ्या नर पेंग्विनसोबत पाहिल्याने भडकलेल्या पेंग्विनने आपल्या प्रतिस्पर्धी पेंग्विनशी झुंज देऊन जखमी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Wife penguin trembled with his wife! | पत्नीला 'त्याच्या'सोबत पाहून पेंग्विन भडकला!

पत्नीला 'त्याच्या'सोबत पाहून पेंग्विन भडकला!

ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि, 5  -  विवाहबाह्य संबंध, जोडीदाराला धोका देण्याच्या घटना केवळ माणसांमध्येच घडतात, असे नाही. प्राण्यांमध्येही नर-मादीकडून एकमेकांना धोका दिला जातो. आपल्या मादीला दुसऱ्या नर पेंग्विनसोबत पाहिल्याने  भडकलेल्या पेंग्विनने आपल्या प्रतिस्पर्धी पेंग्विनशी झुंज देऊन जखमी केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.  नॅशनल जिऑग्राफिक वाहिनीने प्रसारित केलेला हा व्हिडीओ ट्विटरसह सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. 
हा पेंग्विन जेव्हा बाहेरून आपल्या निवाऱ्याकडे येतो तेव्हा त्याला आपली मादी अन्य पेंग्विनसोबत प्रणयधुंद झालेली आढळते. त्यामुळे संतापलेला पेंग्विन आणि त्याचा प्रतिस्पर्धी पेंग्विन यांच्यात जीवघेणी झुंज सुरू होते. दोघेही एकमेकांना रक्तबंबाळ करतात, असे या व्हिडीओत दिसत आहे. 
 

Web Title: Wife penguin trembled with his wife!