शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कुलभूषण आणि आई-पत्नीच्या भेटीत का होती काचेची भिंत? पाकिस्तानचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 17:39 IST

काचेच्या एका बाजूला कुलभूषण जाधव बसले होते तर दुसऱ्या बाजूला त्यांची आई आणि पत्नी बसली होती. ते एकमेकांना दिसत होते पण काही अंतरावर असूनही त्यांना एकमेकांना मायेचा स्पर्श करता आला नाही.

 इस्लामाबाद: पाकिस्तानात हेरगिरीच्या आरोपाखाली कैद असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांनी आज(दि.25) त्यांची आई आणि पत्नीची भेट घेतली. तब्बल दीड वर्षांनंतर त्यांची कुटुंबीयांसोबत भेट झाली. 40 मिनिटांच्या या भेटीनंतर कुलभूषण जाधव यांची आई  व पत्नी लगेचच व्यावसायिक विमानाने भारताकडे रवाना झाले.भेटीसाठी खास काचेची रूम -पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात या भेटीसाठी खास काचेच्या भिंतींची इंटरकॉम रुम तयार करण्यात आली होती. काचेच्या एका बाजूला कुलभूषण जाधव बसले होते तर दुसऱ्या बाजूला त्यांची आई आणि पत्नी बसली होती. ते एकमेकांना दिसत होते पण काही अंतरावर असूनही त्यांना एकमेकांना मायेचा स्पर्श करता आला नाही. त्यामुळे थेट संवाद न होता इंटरकॉमच्या माध्यमातूनच त्यांच्यात बोलणं झालं.तब्बल दीड वर्षानंतर झालेल्या या भेटीदरम्यान काचेची भिंत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यावरून पाकिस्तानवर टीका होत आहे.  का होती काचेची भिंत -या भेटीनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली असता त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. या भेटी दरम्यान काचेची भिंत का होती असा प्रश्न पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैसल यांना विचारण्यात आला. त्यावर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काचेची भिंत ठेवण्यात आली होती असं ते म्हणाले. कुलभूषण जाधवची भेट घेता येईल पण भेटीदरम्यान सुरक्षेची काळजी घेतली जाईल असं आम्ही भारताला यापूर्वीच कळवलं होतं असं स्पष्टीकरण मोहम्मद फैसल यांनी दिलं आहे.

मी पाकिस्तान सरकारचा आभारी- जाधव

या भेटीनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने  पत्रकार परिषद घेऊन भेटीनंतरचा एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओत कुलभूषण जाधव यांनी पाकिस्तान सरकारचे आभार मानले आहेत. आई आणि पत्नीला भेटू द्यावं अशी विनंती मी पाकिस्तानच्या सरकारकडे केली होती. माझी विनंती मान्य केल्याबद्दल मी पाकिस्तान सरकारचे आभार मानतो असं या व्हिडीओत कुलभूषण जाधव म्हणताना दिसत आहेत. सीएनएन न्यूज 18 ने कुलभूषण जाधव यांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

 

दहा मिनीटं भेट वाढवली -

30 मिनिटांची भेट ठरली होती, पण भेट संपायला आली असताना कुलभूषण आणि त्याच्या आई-पत्नीने थोडा वेळ आणखी देण्याची विनंती केली. त्यावर त्यांची विनंती मान्य करत दहा मिनीटं वेळ वाढवण्यात आली अशीही माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली.    

ही शेवटची भेट नाही -

कुलभूषण जाधव यांची त्यांच्या नातेवाईकांसोबतची ही शेवटची भेट म्हणावी का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, या भेटीला शेवटची भेट म्हणता येणार नाही, ही पूर्णपणे केवळ मानवतेच्या दृष्टीने झालेली भेट होती. असं सूचक वक्तव्य पाकिस्तानच्या पररराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे. 

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवIndiaभारतPakistanपाकिस्तान