शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलमध्ये का काढले जात आहे मृत सैनिकांचे स्पर्म? कारण जाणून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 11:24 IST

Israel News: गाझा युद्धामुळे इस्रायलमधील नागरिक आणि सैनिकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून त्यांच्या मृतदेहातून स्पर्म काढण्याचा ट्रेंडही वाढताना दिसत आहे.

गाझा युद्धामुळेइस्रायलमधील नागरिक आणि सैनिकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून त्यांच्या मृतदेहातून स्पर्म काढण्याचा ट्रेंडही वाढताना दिसत आहे. सध्या इस्रायलमध्ये मृतदेहाचे स्पर्म काढण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचा कायदेशीर नियम नाही. पण, आता असे करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने देशात चर्चा सुरू झाली आहे आणि खासदार मंडळी यासंदर्भात कायदा करण्याचा विचार करत आहेत. 

बीबीसीच्या वृत्तानुसार, गेली काही महिने इस्रायलसाठी अत्यंत वेदनादायी होते. 7 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालेल्या युद्धात सुमारे 1600 इस्रायली लोकांचा मृत्यू झाला आहे. या 1600 पैकी 170 सैनिक आणि सर्वसामान्य नागरिकांचे स्पर्म सुरक्षित करण्यात आले आहेत. हा आकडा तब्बल 15 टक्के एढा आहे. गेल्या वर्षात ही संख्या केवळ 1 टक्का एवढी होती.

अशी आहे मृतदेहातून स्पर्म काढण्याची प्रक्रिया - डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू नंतर 72 तासांच्या आत ही सर्जरी करावी लागते. या प्रक्रियेत टेस्टिकल्सला कट मारून टिशूच्या माध्यमाने लॅबमध्ये पाठविले जाते. यानंतर, कुटुंबाला हे स्पर्म वापरण्याची परवानगी जोवर मिळत नाही, तोवर ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवले जाते. 

यापूर्वी, एखादे कुटुंब जेव्हा विनंती करत होते, तेव्हाच ही प्रक्रिया केली जात होते. न्यायालयाची परवानगीही मिळत होते. मात्र आता कायद्याचे बंधन नाही. यामुळेच येथे स्पर्म घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

यासंदर्भात विधेयक मंजूर करून घेण्याच्या प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. महत्वाचे म्हणजे, मृत व्यक्तीला मूल हवे होते, हे कुटुंबियांना सिद्ध करावे लागेल. त्यानंतरच त्याचे स्पर्म काढण्याची परवानगी दिली जाईल, अशी एक तरतूद या विधेयकात आहे. तसेच, सैनिकांकडून आधीच लेखी संहमती घेण्याची तरतूद करावी, अशी ज्यू धर्मगुरूंची इच्छा आहे. 

टॅग्स :Israelइस्रायलwarयुद्धSoldierसैनिक