शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

चीन का साधतोय सौदी अरेबियाशी जवळीक?; मोठ्या खुलाशामुळे अमेरिकेची झोप उडाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 23:01 IST

सौदी अरेबिया आणि चीन यांच्यातील संबंधातील मजबुतीमुळे अमेरिका अस्वस्थ आहे.

रियाध - सौदी अरेबिया आणि चीनमधील मजबूत होत असलेल्या संबंधांमुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे. दोन्ही देश वेगाने द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यात गुंतले आहेत. सौदी अरेबिया स्टेट व्हिजन २०३० ला पुढे नेत असताना दुसरीकडे चीन बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) विस्तार होत चालला आहे. २०१६ मध्ये सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी व्हिजन २०३० लाँन्च केले होते. क्राउन प्रिन्स सलमानला पुढे जाण्यासाठी चीनचा बीआरआय सोबत घ्यायचा आहे. शिवाय, जागतिक भू-राजकीय परिस्थितीमुळे चीन आणि सौदी अरेबियाला एका व्यासपीठावर येण्यास मदत झाली आहे. गेल्या दशकभरापासून अमेरिकेचं समर्थन करणाऱ्या सौदी अरेबियाला आता अपेक्षित हेतू साधता येत नाही. अशा परिस्थितीत चीनला संधी मिळाली आणि त्याने अमेरिकेची जागा स्वतःहून घेतली. सौदी अरेबिया आणि चीन यांच्यातील संबंधातील मजबुतीमुळे अमेरिका अस्वस्थ आहे.

सौदी अरेबियाच्या व्हिजन २०३० मध्ये पर्यटन हा सर्वात मोठा फोकस आहे. २०१९ मध्ये पर्यटकांचा सोर्स म्हणून चीन जगात पहिल्या क्रमांकावर होता. चिनी लोकांनी १५५ मिलियन परदेश दौरे केले आहेत आणि चीनी लोकांनी बाहेर सुट्ट्यांवर २५० अब्ज डॉलरपेक्षा जास्त खर्च केले आहेत. कोविड महामारीमुळे ही संख्या नंतर २०२० आणि २०२१ मध्ये २० आणि २६ मिलियनवर आली. अशा परिस्थितीत चीनमधून अधिकाधिक पर्यटकांना आपल्या देशात आकर्षित करण्याचा सौदी अरेबियाचा प्रयत्न आहे. हे तेव्हाच शक्य होऊ शकते जेव्हा सौदी अरेबियाचे चीनसोबतचे संबंध अतिशय मजबूत असतील. सौदी अरेबियात अमेरिकेचं वर्चस्व राहिला असता तर चीनशी मैत्री वाढवण्यात अडचणी आल्या असत्या. यामुळेच सौदीने अमेरिकेची सुटका करून चीनचा हात धरला.

पर्यटनातून कमवायचाय पैसासौदी अरेबिया दशकाच्या अखेरीस पर्यटनातून वार्षिक ४६ अब्ज डॉलर कमावण्याचा विचार करत आहे. अशा परिस्थितीत चिनी पर्यटक या कामात सर्वात मोठी भूमिका बजावू शकतात, असे आखाती देशातील सर्वात शक्तिशाली देशाला वाटते. २०१९ मध्ये, सौदी अरेबियाने पर्यटनाद्वारे विक्रमी १९.८५ अब्ज डॉलर्स कमावले, त्यानंतर सौदी अरेबियाच्या पर्यटन महसूलात COVID महामारीमुळे लक्षणीय घट झाली. अशा परिस्थितीत सौदी अरेबिया तेल उत्पादक देश असल्याच्या शिक्क्यापासून मुक्त होण्यासाठी पुन्हा एकदा पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे.

चीनलाही सौदीकडून फायद्याची अपेक्षाझिरो कोविड धोरणामुळे चीनही आर्थिक धक्क्यातून सावरत आहे. अशा परिस्थितीत सौदी अरेबियासारख्या मोठ्या आणि बलाढ्य देशाच्या पाठिंब्याची गरज आहे. मुस्लिम देशांमध्ये सौदी अरेबियाचा प्रभाव खूप जास्त आहे. मुस्लिमांवरील अत्याचारावरून चीनला आधीच टीकेला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत सौदी अरेबियाचा पाठिंबा मिळाल्याने त्याला मोठा दिलासा मिळू शकतो. दुसरीकडे, चीन आपल्या उर्जेच्या गरजेचा मोठा सोर्स सौदी अरेबियाकडून मिळवतो. अलीकडे यात रशियाचा सहभाग खूप वाढला आहे, पण भविष्यात सौदी अरेबिया तेल आणि वायू पुरवठ्याचा सर्वात मोठा सोर्स असेल. त्यामुळेच दोन्ही देशांचे संबंध वेगाने घट्ट होत आहेत. 

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाchinaचीनAmericaअमेरिका