शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भारताने ‘सीएए’ कायदा का केला हे अनाकलनीय - शेख हसीना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 04:28 IST

सीएए’ व ‘एनआरसी’ या भारताच्या अंतर्गत बाबी आहेत, अशी बांगलादेशाची सातत्याची भूमिका आहे. ‘एनआरसी’ हे भारताने फक्त आपल्या देशांतर्गत हाती घेतलेले काम आहे

दुबई : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर (एनआरसी) या भारताच्या अंतर्गत बाबी आहेत, हे मान्य केले तरी भारताने या अनावश्यक गोष्टी का कराव्यात हे अनाकलनीय आहे, असे वक्तव्य बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केले आहे.शेख हसीना सध्या संयुक्त अरब अमिरातींच्या दौऱ्यावर आहेत. ‘सीएए’वरून सध्या भारतात सुरू असलेल्या विरोधाच्या संदर्भात विचारता ‘गल्फ न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, ‘सीएए’ व ‘एनआरसी’ या भारताच्या अंतर्गत बाबी आहेत, अशी बांगलादेशाची सातत्याची भूमिका आहे. ‘एनआरसी’ हे भारताने फक्त आपल्या देशांतर्गत हाती घेतलेले काम आहे, असे भारत सरकारने वारंवार सांगितले आहे व गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये नवी दिल्ली भेटीत पंतप्रधान मोदी यांनी मला तसे आश्वासनही दिले आहे.तरीही या गोष्टी भारत सरकार काय करीत आहे? त्याची काही गरज नव्हती, अशी पुस्तीही शेख हसीना यांनी जोडली. बांगलादेशच्या एकूण १६.१ कोटी लोकसंख्येत १०.७ टक्के हिंदू व ०.६ टक्के बौद्ध आहेत व तेथून धार्मिक छळामुळे लोक भारतात जातात याचे बांगलादेशने खंडन केलेले आहे. शेख हसीना म्हणाल्या की, लोकांनी भारतातून बांगलादेशात उलटे स्थलांतर केल्याच्या नोंदी नाहीत. मात्र, भारतातील भारतात लोकांना त्रास सोसावा लागत आहे; पण हीसुद्धा भारताची अंतर्गत बाब आहे. औपचारिकपणे बांगलादेशाने ही भूमिका घेतली असली तरी भारतातील या दोन्ही घडामोडींवरून तेथे बरीच अस्वस्थता आहे.ही भारताची अंतर्गत बाब असली तरी त्याचा परिणाम शेजारी देशांवरही होऊ शकतो, असे बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी बोलून दाखविले आहे. एवढेच नव्हे तर ‘सीएए’ मंजूर झाल्यानंतर बांगलादेशच्या तीन मंत्र्यांनी भारताचे नियोजित दौरे रद्दही केलेहोते. पंतप्रधान शेख हसीना मात्र या मुलाखतीत म्हणाल्या की, सध्या भारत व बांगलादेशचे संबंध सर्वोत्तम आहेत व दोन्ही देशांमध्ये व्यापक पातळीवर सहकार्य सुरू आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक