शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन मिनिटांमध्ये समजून घ्या, तुर्कस्थानचे चलन का घसरले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 12:00 IST

अमेरिकेने निर्बंध लादल्यास अमेरिकेन इलेक्ट्रोनिक वस्तूंवर बंदी घालू अशी धमकी तुर्कस्थानने घातली आहे.

अंकारा- भारताचा रुपया गेल्या काही दिवसांमध्ये सतत घसरत आहे. मंगळवारी भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेमध्य़े 70.7वर दाऊन पोहोचला होता. याप्रमाणेच जगभरातील इतर देशांचे चलनही कमी अधिकप्रमाणात घसरले आहे. सर्वात मोठा फटका तुर्कस्थानच्या लिरा या चलनाला बसलेला आहे. तुर्कस्थानच्या उदाहरणावरुन सर्व देशांनी आताच उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. गेल्या वर्षभरात लिराचा दर 50 टक्क्यांनी घसरला आहे.

 लिराचा दर का घसरला? हे जाणून घेण्यासाठी पुढील मुद्द्यांचा विचार करता येईल.1) तुर्कस्थानातील राजकीय आणि आर्थिक प्रश्नांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असून त्यामुळे चलनवाढ झाली आहे. तुर्कस्थानच्या तिजोरीतील परदेशी चलनाचा साठाही कमी होत चालला आहे.

2) जुलै महिन्यामध्ये तुर्कस्थानात चलनवाढीचा दर 16 टक्क्यांवर पोहोचला असून परदेशी कर्जांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचप्रमाणे वित्तिय तूटही वाढल्यामुळे अर्थव्यवस्था अधिकाधिक नाजूक होत चालली आहे.3) तुर्कस्थानामध्ये अमेरिकन ख्रिश्चन धर्मगुरु आणि , नासाचे वैज्ञानिक आणि अमेरिकन वाणिज्यदुतावासात काम करणारे काही तुर्की नागरिकांना अटक करण्यात आलेली आहे. या लोकांनी तुर्कस्थानात झालेल्या लष्करी बंडाला मदत केल्याचा आरोप केला आहे. मात्र अमेरिकन नागरिकांना तात्काळ सोडावे यासाठी अमेरिकेने वारंवार मागणी केली आहे. या लोकांना सोडण्यासाठी करण्यात येणारा करार अंतिम टप्प्यात आला असतानाच बोलणी फिस्कटली.  त्यावर अमेरिकेने तुर्कस्थानावर निर्बंध लादण्याचे जाहीर केले. यामुळे तुर्कस्थानचे चलन अधिकच घसरले.4) तुर्कस्थानामध्ये मध्यवर्ती बँकेतील कामकाजात सरकारचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप होत असल्याचा आरोप होतो. मध्यवर्ती बँकेवर अध्यक्ष म्हणून तुर्की राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी आपल्या अर्थमंत्र्यांच्या जावयाला नेमले आहे. त्यामुळे बँकेच्या विश्वासार्हतेवक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

5) तुर्कस्थानने स्पॅनिश बँकांकडून 83.3 अब्ज डॉलर, फ्रेंच बँकांकडून 38.4 अब्ज डॉलर, इटालियन बँकांकडून 17 अब्ज डॉलर, जपानच्या बँकांकडून 14 अब्ज डॉलर, ब्रिटिश बँकांकडून 19.2 आणि अमेरिकेकडून 18 अब्ज डॉलरचे कर्ज घेतलेले आहे.

भारतीय रुपयाची स्थिती कशी आहे?भारतीय रुपया सुद्धा सलग काही दिवस घसरत चालला असून 2018मध्ये त्याची डॉलरच्या तुलनेमध्ये 9 टक्के इतकी घसरण झालेली आहे. 63. 67 पासून 70.7 अशी रुपयाची घसरण होत गेली. परदेशी गुंतवणूकदारांनी विक्री केल्यामुळे रुपयावर परिणाम झाला. त्याचप्रमाणे लिराचा दर घसरल्यामुळे जगातील अनेक बाजारांवर परिणाम झाला असून रुपयावरही त्याचा परिणाम झाला.

 

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाUnited StatesअमेरिकाIndiaभारत