शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 11:45 IST

इराण आणि इस्त्रायल यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. त्यात चीन आणि रशियाने हा संघर्ष संपवण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दाखवली आहे.

इस्त्रायल आणि इराण यांच्यात ५ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. हे दोन्ही देश एकमेकांच्या शहरांवर सातत्याने मिसाईल हल्ले करत आहेत. त्यामुळे मध्य पूर्वेत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच रशिया आणि चीन यांनी या दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

इस्त्रायल आणि इराण यांच्यातील सध्याच्या स्थितीवर रशियाचे राष्ट्रपती कार्यालयाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी म्हटलं की, मागील काही काळापासून पुतिन हे जागतिक नेत्यांशी फोनवरून महत्त्वाची चर्चा करत आहेत. त्यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूपासून इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून संवाद साधला. आवश्यकता भासल्यास या दोन्ही देशातील तणावात रशियाची मध्यस्थी करण्याची तयारी आहे जेणेकरून परिस्थिती सुधारता येईल आणि मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित केली जाईल असं त्यांनी सांगितले.

त्याशिवाय आम्ही या दोन्ही देशातील स्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही नेतन्याहू यांचे विधान ऐकले आणि वाचलेही. या भागात धोकादायक स्थिती निर्माण करणाऱ्या कारवायांचा आम्ही निषेध करतो असंही दिमित्री पेस्कोव यांनी म्हटलं आहे. तर केवळ रशियाच नाही चीननेही इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धात मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी इस्त्रायलचे परराष्ट्र मंत्री यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यांनी इस्त्रायल आणि इराण यांना चर्चेतून मतभेद सोडवण्याचा सल्ला दिला. चीन या दोन्ही देशात मतभेद मिटवण्यासाठी भूमिका निभावेल असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवत्ते गुओ जियाकुन यांनी म्हटलं.

दरम्यान, चीनने कायम राजनैतिक आणि डिप्लोमॅटिक माध्यमातून इराणच्या अण्वस्त्राच्या मुद्द्यावर शांततेने समाधान काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. चीन दोन्ही देशांशी समन्वय आणि संवाद सुरू ठेवेल. तणावाची स्थिती कमी करण्यासाठी निर्णायक भूमिका घेईल. आम्ही या दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी मोठी भूमिका निभावण्यासाठी तयार आहोत असंही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जियाकुन यांनी सांगितले आहे.

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलchinaचीनrussiaरशिया