शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सिगारेटसाठी हत्या… अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये भारतीय तरुणावर गोळीबार! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 10:31 IST

या गोळीबाराच्या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

अमेरिकेत सिगारेटचे पाकीट एका भारतीय तरुणाच्या मृत्यूचे कारण ठरले. दासरी गोपीकृष्ण असे मृत तरुणाचे नाव असून ते अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये काम करत होते. फक्त सिगारेटच्या पॅकेटसाठी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. ही घटना २१ जून रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ वर्षीय गोपीकृष्ण हे शनिवारी दुपारी दुकानाच्या काउंटरवर होते. यादरम्यान, अज्ञात हल्लेखोराने दुकानात घुसून गोळीबार केला. या गोळीबारात काउंटरवर उपस्थित असलेले गोपीकृष्ण गंभीर जखमी झाले. यावेळी हल्लेखोराने आपल्याला हवे असलेले सिगारेटचे पाकीट घेऊन तेथून पळ काढला. या घटनेनंतर गोपीकृष्ण यांना उपस्थित लोकांनी जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र, रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्यामध्ये हल्लेखोर गोळीबार करताना स्पष्ट दिसत आहे.

गोपीकृष्ण हे आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यातील कर्लापलेम मंडलातील याजली येथील रहिवासी होते. नोकरीनिमित्त ते पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलासह अमेरिकेला गेले होते. अमेरिकेत ते एका नातेवाईकाच्या घरी राहत होते. तसेच, गोपीकृष्ण हे अमेरिकेतील अर्कान्ससमधील एका सुपरमार्केटमध्ये काम करत होते. या गोळीबाराच्या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

दरम्यान, ह्युस्टनमधील भारतीय दूतावासानेही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. दूतावासाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यात गोपीकृष्ण यांच्या निधनाची घटना अत्यंत दुःखद असल्याचे म्हटले आहे. तसेच, दूतावासानेही मृतांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे. स्थानिक कुटुंबीयांच्या संपर्कात असून सर्वतोपरी मदत करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून पीडित कुटुंबाला मदत करण्याचे आश्वासनआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी गोपीकृष्णाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला असून पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यात त्यांनी लिहिले आहे की, गोपीकृष्ण यांचे पार्थिव घरी आणण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल. सरकार त्यांच्या कुटुंबासोबत आहे. यासोबतच चंद्राबाबू नायडू यांनी कुटुंबाप्रती संवेदनाही व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :AmericaअमेरिकाAndhra Pradeshआंध्र प्रदेशFiringगोळीबार