शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Coronavirus News: वुहानच्या लॅबमधून नव्हे, तर प्राण्यांपासूनच मानवाला कोरोनाची लागण: WHO चा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 14:53 IST

Corona Virus Update: कोरोना विषाणूचं उगमस्थान आणि प्रसाराची कारणमिमांसा करण्यासाठी 'डब्ल्यूएचओ'चं एक विशेष पथक चीनमध्ये दाखल झालं होतं.

कोविड-१९ च्या जागतिक महामारीला (Corona Virus) कारणीभूत ठरलेला विषाणू वटवाघुळांकडून इतर प्राण्यांमध्ये संक्रमित झाला आणि त्यानंतर त्याची मानवाला लागण होऊन तो जगभर पसरला असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) प्रसिद्ध केला आहे. कोरोना विषाणूचं उगमस्थान आणि प्रसाराची कारणमिमांसा करण्यासाठी 'डब्ल्यूएचओ'चं एक विशेष पथक चीनमध्ये दाखल झालं होतं. या पथकानं व्हायरसल संदर्भातील संपूर्ण संशोधन करुन त्याबाबतचा अहवाल 'डब्ल्यूएचओ'कडे सोपवला आहे. 

कोरोना विषाणूची उत्पत्ती चीनमधील वुहान येथील प्रयोगशाळेत झाल्याचा आरोप करण्यात आला होता. वुहान प्रांतामध्येच जगातील पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. त्यामुळे यामागे वुहानमधील प्रयोगशाळाच कारणीभूत असल्याचे आरोप केले गेले. डिसेंबर २०१९ रोजी पहिला रुग्ण समोर आल्यानंतर कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात वाऱ्याच्या वेगानं पसरला. दुसऱ्याबाजूला कोरोना व्हायरस संदर्भातील माहिती लपविल्याचा आरोप चीनवर वारंवार केला जाऊ लागला. दरम्यान, चीननं व्हायरसच्या प्रसाराबाबत हात झटकून याचा प्रसार सी-फूडमधून झाल्याचं जाहीर करुन टाकलं होतं. चीनच्या याच दाव्याचा अभ्यास करण्यासाठी 'डब्ल्यूएचओ'चं पथक चीनमध्ये दाखल झालं होतं. 

अहवालाला उशीर का झाला?एपी या वृत्तसंस्थेच्या हाती लागलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे की, व्हायरस संदर्भातील काही प्रश्नांची अपेक्षित उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत. पथकानं चीनच्या प्रयोगशाळेतून व्हायरस पसरल्याचा मुद्दा वगळून इतर सर्व पैलूंवर संशोधन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. अहवाल जाहीर करण्यात वारंवार दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे चीनी सरकार संशोधनात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न तर करत नाहीय ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे. व्हायरसच्या प्रसारासंबंधिचा अहवाल काही  दिवसांतच जाहीर केला जाईल असं डब्ल्यूएचओच्या एका अधिकाऱ्यानं गेल्या आठवड्यात सांगितलं होतं. 

संशोधकांनी चार मुद्द्यांवर दिला भरअसोसिएटेड प्रेस (AP) या वृत्तसंस्थेला WHO चे सदस्य देश असलेल्या जिनेव्हा स्थित एका अधिकाऱ्यांपासून अहवालाचा ड्राफ्ट हाती मिळाला. दरम्यान, नेमका हाच अहवाल अंतिम स्वरुपाचा असून तोच जाहीर केला जाईल की नाही याबाबद अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अहवालात चार मुद्द्यांवर सखोल संशोधन झालं असून यातून व्हायरसच्या प्रसाराबाबतची कारणमिमांसा करण्यात आली आहे. 

वटवाघळांवरच वैज्ञानिकांना संशयकोरोना विषाणू थेट वटवाघळांकडून मानवात संक्रमित झाल्याची शक्यता खूप कमी असल्याचा निष्कर्ष वैज्ञानिकांनी मांडला आहे. सुरुवातीला वटवाघळांकडून इतर प्राण्यांमध्ये कोरोना व्हायरसचं संक्रमण झालं. त्यानंतर त्या प्राण्यांच्या माध्यमातून व्हायरस मानवात संक्रमित झाल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. 'कोल्ड चैन फूड प्रोडक्ट्स'च्या माध्यमातून व्हायरचा प्रसार वेगानं झाल्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस