काठमांडू: सरकारविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 'जेन झी' आंदोलनकर्त्यांमधून एक नवीन चेहरा पुढे आला आहे तो म्हणजे काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह, मूळचे रॅपर गायक, इंजिनिअरमधील शिक्षण घेतलेल्या शाह यांना 'बालेन' म्हणूनही ओळखले जाते.
सोशल मीडियावर अनेक युजरनी म्हटले आहे की, बालेन हे नव्या पिढीचं बुद्धीने प्रतिनिधित्व करतात. ते निःस्वार्थी देशासाठी काम करतील. एका युजरने एक्सवर लिहिले की, 'प्रिय बालेन, आता वेळ आली आहे... पुढे या आणि नेतृत्वाची धुरा हाती घ्या. संपूर्ण नेपाळ तुमच्यासोबत आहे.'
कोण आहेत बालेंद्र शाह?
जन्म : १९९० साली काठमांडूमध्ये.
शिक्षण : सिव्हिल इंजिनिअरिंग तसेच स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स (भारतातील विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीतून)
करिअर : रॅपर, गीतकार म्हणून काम म्हणून त्यांनी काम केले. तेव्हा त्यांनी सामाजिक विषमता आणि भ्रष्टाचार यावर भाष्य करणारी गाणी लिहून ती सादर केली. सध्या शाह यांनी येथे शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.