कोण आहे मन हारुण मोनिस?
By Admin | Updated: December 16, 2014 04:53 IST2014-12-16T04:53:33+5:302014-12-16T04:53:33+5:30
मन हारुण मोनिस या नावाने अपहरणकर्त्याची ओळख पटली आहे. आॅस्ट्रेलियन माध्यमांच्या मते, पोलीस कारवाईत मोनिस मारला गेला आहे.

कोण आहे मन हारुण मोनिस?
मन हारुण मोनिस या नावाने अपहरणकर्त्याची ओळख पटली आहे. आॅस्ट्रेलियन माध्यमांच्या मते, पोलीस कारवाईत मोनिस मारला गेला आहे. मोनिसच्या माजी वकिलाच्या दाव्यानुसार, तो कुठल्याही संघटनेशी संबंधित नाही आणि एकटाच काम करतो. ४९ वर्षीय मोनिसवर अनेक गंभीरगुन्ह्यांसाठी आॅस्ट्रेलियात खटला सुरू आहे. सध्या तो जामिनावर असून आॅस्ट्रेलियन पोलीस त्याला खूप चांगल्या पद्धतीने ओळखतात. मोनिसवर असाही आरोप आहे की, परदेशात सेवेदरम्यान मृत्युमुखी पडलेल्या आॅस्ट्रेलियन सैनिकांच्या आई-वडिलांना शिवीगाळ करणारी पत्रे तो पाठवत असे.