शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय वंशाच्या प्राध्यापकाचा 'गणिताच्या नोबेल'ने गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 13:13 IST

जगातील चार गणितींचा या पदकाने सन्मान केला गेला असून त्यामध्ये अक्षय यांचा समावेश आहे. हे पदक स्वीकारणाऱ्या अक्षय व्यंकटेश यांचे वय केवळ 36 वर्षे आहे.

नवी दिल्ली- ऑस्ट्रेलियात शिक्षण घेतलेले पण मूळचे भारतीय वंशाचे अक्षय व्यंकटेश यांचा गणिताचे नोबेल अशी ख्याती असणाऱ्या फिल्डस मेडलने गौरव करण्यात आला आहे. यावेळेस जगातील चार गणितींचा या पदकाने सन्मान केला गेला असून त्यामध्ये अक्षय यांचा समावेश आहे. हे पदक स्वीकारणाऱ्या अक्षय व्यंकटेश यांचे वय केवळ 36 वर्षे आहे. फिल्ड पदक मिळवणारे ते दुसरे ऑस्ट्रेलियन आहेत.

अक्षय व्यंकटेश यांचा जन्म नवी दिल्लीमध्ये झाला असून ते डायनामिक्स थिअरीमधील योगदानाबद्दल प्रसिद्ध आहेत. अक्षय दोन वर्षांचे असताना त्यांचे आई-वडिल पर्थमध्ये स्थायिक झाले. अगदी लहानपणापासून त्यांची विज्ञानक्षेत्रातील प्रगती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. अगदी अल्पकाळामध्ये ते गणितातील संशोधक म्हणून जागतिक पातळीवर प्रसिद्ध झाले.

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापिठात वयाच्या 13 व्या वर्षीच प्रवेश मिळवणारे ते सर्वात लहान विद्यार्थी म्हणून ओळखले गेले. त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी गणितामध्ये उत्तम गुणांसह पदवी संपादन केली. असे करणारे ते सर्वात कमी वयाचे विद्यार्थी होते. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी पी.एचडी पदवी संपादित केलीय त्यानंतर त्यांनी मॅसॅच्युसेटस इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजीमध्ये प्रवेश घेतला. तेथे संशोधनकार्य केल्यानंतर ते आता स्टॅनफर्ड विद्यापिठात प्राध्यापक आहेत. 

अक्षय व्यंकटेश यांना आजवर विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून त्यात इन्फोसिस प्राइज, सालेम प्राइज, शास्त्र रामानुजन प्राइज यांचा समावेश आहे. अक्षय व्यंकटेश यांची आई श्वेता व्यंकटेश संगणकशास्त्राच्या प्राध्यापक असून त्या डेकिन विद्यापिठामध्ये सेंटर फॉर पॅटर्न रेकग्निशन अँड डेटा अनालिटिक्स विभागाच्या संचालिका आहेत.

टॅग्स :IndiaभारतAustraliaआॅस्ट्रेलियाNobel Prizeनोबेल पुरस्कारInternationalआंतरराष्ट्रीय